घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपुन्हा पुष्पाराज सक्रिय; सातपूरमधील उद्यानात चंदन चोरी

पुन्हा पुष्पाराज सक्रिय; सातपूरमधील उद्यानात चंदन चोरी

Subscribe

सातपूर : येथील औद्योगिक वसाहती जवळील गणेशनगर महापालिकेच्या पावन गणेश उद्यानातील चंदनाची तीन मोठी झाडे चोरट्यांनी तोडून लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी पावन गणेश उद्यानात गुरुवार (दि ४) मद्यरात्री ते पहाटेदरम्यान चंदनाच्या तीन झाडाचा बुंधा अत्याधुनिक कटरने कापून त्यातील गाभा लंपास केला. सातपूर भागात चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी पोस्ट ऑफिसमधील दोन चंदनाची झाडे, सातपूर कॉलनी सार्वजनिक उद्यान, औद्योगिक कंपनी बंगले याठिकाणांहून चंदन झाडे लंपास केल्या आहेत. २ जुलै रोजी समता नगर येथून घरासमोरील गेट जवळ असलेले चंदनाचे झाड मद्यरात्री तोडून नेताना रहिवाशी जागे झाले असता त्यांना चोरट्यांनी कटर दाखवत बुंधा कापून नेला होता. याप्रकरणी शनिवारी (दि.६) सकाळी आमदार सीमा हिरे यांनी पावन गणेश उद्यानास भेट दिली. पोलिसांनी चंदन चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -