घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशहाजी उमाप नाशिकचे नवे पोलीस अधीक्षक

शहाजी उमाप नाशिकचे नवे पोलीस अधीक्षक

Subscribe

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी मुंबई शहर व्ही. आय. पी. सुरक्षाचे उपआयुक्त शहाजी उमाप यांची नियुक्ती झाली आहे. तर सचिन पाटील यांची राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्तपदी मुंबईला बदली झाली आहे. त्याचप्रमाणे शहर व ग्रामीण पोलीस दलातील इतर अधिकार्‍यांच्याही बदल्या झाल्या आहेत.

सचिन पाटील यांनी डिसेंबर २०२० मध्ये नाशिक अधिक्षकपदाची जबाबदारी घेतली होती. त्यांची पुन्हा मुंबईला बदली करण्यात आली आहे. शहाजी उमाप यांची नियुक्ती पोलीस अधीक्षकपदी झाली आहे. ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांची औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिक्षकपदी बदली झाली आहे. महाराष्ट्र पोलीसअकादमी येथे पोलीस अधीक्षक म्हणून चाळीसगावचे अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, श्रीरामपूर येथील अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, नागपूर येथील राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपआयुक्त अनिता पाटील यांची बदली झाली आहे. मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे अकबर पठाण यांची नागरी हक्क सरंक्षण पोलिस अधीक्ष पोलीस बदली झाली आहे. तर माधुरी केदार यांची ग्रामीण अपर पोलीसअधीक्षकपदी बदली झाली आहे.

- Advertisement -

नाशिकचे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांची मुंबईला बदली झाली आहे. ठाणे येथील अनिल पोवार यांची महाराष्ट्र पोलीस अकादमीत उपअधीक्षक म्हणून बदली झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीसअधिक्षक निलेश सोनवणे यांची ठाणे शहरात सहायक पोलीसआयुक्त म्हणून बदली झाली आहे. नांदेडचे उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांची नाशिक शहरात सहायक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. मालेगावचे उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांची कोल्हापूरला जिल्हा जात पडताळणी समितीत बदली झाली आहे. पोलीस अकादमीतील पोलीस उपअधिक्षक सुभाष कांबळे यांची पुणे येथे बदली झाली. नंदुरबार येथील पुष्कराज सूर्यवंशी यांची मालेगाव उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -