घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रधुमश्चक्री! अतिक्रमण विभागाच्या वाहनांवर दगडफेक; मनपा-पोलिसांच्या नियोजनाचा अभाव

धुमश्चक्री! अतिक्रमण विभागाच्या वाहनांवर दगडफेक; मनपा-पोलिसांच्या नियोजनाचा अभाव

Subscribe

नाशिक : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभित करण्यात आलेल्या गौरी पटांगण ते टाळकुटेश्वर पूल या दरम्यानच्या शाही मिरवणूक मार्गावरील झोपड्यांचे पादचारी मार्गावर झालेले अतिक्रमण मंगळवार (दि. २३) रोजी हटविण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गेले असता त्यांना विरोधाचा सामना करावा लागला.

पालिकेच्या पंचवटी विभागासह उर्वरित पाचही विभागाच्या संयुक्त मोहिमेद्वारे शाही मार्गावरील अतिक्रमित झोपडपट्टी हटविण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात आली. यावेळी ८ ते १० झोपड्या हटवत पुढील कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाड्या पुढे निघाले. त्यावेळी झोपडी धारक महिलांनी पालिका अधिकारी-कर्मचारी व पोलीस यांना अतिक्रमण काढण्यासाठी तीव्र विरोध केला. त्यावेळी अतिक्रमण धारक आणि पालिका कर्मचार्‍यांमधील वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.

- Advertisement -

अतिक्रमण मोहीम सुरु ठेवण्यात आल्याने संतप्त होत या झोपडीधारक महिला व मुलांनी महापालिकेच्या गाड्यांवर दगडफेक केली. या हल्ल्यात महापालिकेच्या पोलिस वाहन गाडीवर दगडफेक करून तिची काच फोडल्याची घटना घडली असून मनोज जोगळेकर सुरक्षा रक्षक, रवि काथोडे, श्रावण शिराळ हे किरकोळ जखमी झाले. खरंतर महापालिकेकडून सप्टेंबर महिन्यात देखील जेव्हा या ठिकाणी कारवाई करण्यासाठी अतिक्रमण पथक पोहोचले होते तेव्हा देखील अश्याच प्रकारे विरोध या झोपडपट्टी धारकांकडून झाला होता. त्यामुळे महापालिकेने किंवा विभागीय अधिकारी यांनी नियोजन करून व पुरेसे सुरक्षा यंत्रणा सोबत घेत ही अतिक्रमण मोहीम राबविणे गरजेचे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

गुन्हा दाखल न केल्याने कर्मचारी नाराज

महापालिकेच्या मालकीच्या पोलीस वाहनांची काच कारवाई दरम्यान फोडण्यात आली असता यावेळी वाहक विशाल खाडे हे थोडक्यात बचावले. तर इतरवेळी सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचा धाक दाखवणारे महापालिका अधिकारी यावेळी अतिक्रमण कारवाईला अडथळा निर्माण केला म्हणून या विरोधात रात्री उशिरा पर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंदविला नसल्याने अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली.

- Advertisement -

अनेक वर्षांपासून अतिक्रमण वाहनावर एकच वाहक

विशाल पाटील नामक वाहक जवळपास ७ ते ८ वर्षांपासून पंचवटी विभागातील अतिक्रमण विभागाच्या वाहनावर आहे. यामुळे पाटील विरोधात पंचवटीतील अनेक अतिक्रमण धारकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली असली तरी दुसरीकडे महापालिका अंतर्गत देखील इतर कर्मचारी वरिष्ठांकडे नाहक तक्रारी करत असल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -