घरमहाराष्ट्रनाशिकविद्यार्थ्यांना तिसर्‍या टप्प्यात मिळणार कोरोना लस

विद्यार्थ्यांना तिसर्‍या टप्प्यात मिळणार कोरोना लस

Subscribe

प्रशासनाचे नियोजन : जिल्ह्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

आगामी काही महिन्यांत कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याने त्यादृष्टीने प्रशासन सज्ज झाले असून, विद्यार्थ्यांना तिसर्‍या टप्प्यात कोरोना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना त्यानंतर पोलीस, सैनिकांसह फ्रंटलाईन कर्मचार्‍यांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

कोरोनाची लस उपलब्ध झाल्यास कशा पध्दतीने तीचे वितरण करायचे याविषयी प्रशासनाचे नियोजन सुरु आहे. जिल्ह्यातील 16 हजार आरोग्य कर्मचार्‍यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येईल. त्यानंतर पोलीस, सैनिक, माजी सैनिक या फ्रंटलाईन कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यानंतर जिल्ह्यातील सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे अडीच लाख विद्यार्थी आहेत. तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह महापालिका, नगरपालिका आणि खासगी शिक्षण संस्थांमधील विद्द्यार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. तसेच एका दिवसात साधारणत: 60 हजार नागरीकांना लस देण्याचे नियोजन झाले आहे. त्यासाठी जिल्ह्यात 650 लसीकरणाचे बुथ निर्माण केले आहेत. एका बुथवर किमान 100 नागरीकांना एका दिवसात लसीकरण करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

आरोग्य कर्मचार्‍यांनंतर पोलीस, सैनिकांना लसीकरणाचे नियोजन झाले आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरीकांसोबतच विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने विचार केला जाईल. त्यादृष्टीने आता नियोजन करत आहोत.
– कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -