घरपालघरMeera-Bhayander crime: चार सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई

Meera-Bhayander crime: चार सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई

Subscribe

या चारही तडीपार इसमांना ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर, या जिल्हा कार्यक्षेत्रातून तडीपार करण्यात आले आहे.

भाईंदर :- मीरा -भाईंदर ,वसई- विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हेगारी कारवाई करणार्‍या चार सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. या चार गुन्हेगारांना ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर, या जिल्हा कार्यक्षेत्रातून तडीपार करण्यात आले आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ १ मधील नवघर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार छैलसिंग शिवसिंग जेतावत याच्यावर २०१७ ते २०२३ या दरम्यान गुन्हे दाखल असून नवघर पोलीस ठाणे हद्दीत तसेच त्यालगतच्या परिसरातून त्याला तडीपार करण्यात आले आहे. तसेच मीरारोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार विशाल विनोद गोस्वामी ( २८ ) याच्यावर २०१७ व २०२३ मध्ये नाशिक रोड, वर्तकनगर, काशिमीरा व मीरारोड पोलीस ठाणे हद्दीत फसवणूक व मारामारी करण्याचे गुन्हे दाखल असून मिरारोड, काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत तसेच त्यालगतच्या परिसरातून त्याला तडीपार करण्यात आले आहे.

तसेच नवघर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार शिवप्रसाद कुशाल शेट्टी ( ३३ ) याच्यावर २०११ व २०२४ मध्ये दरोडा, घरफोडी, मारामारी, दारु पिवून दंग्या बाबत नयानगर, मीरारोड, नवघर, उत्तन पोलीस ठाणे व आजूबाजूच्या परिसरातून तडीपार करण्यात आले आहे. तसेच काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आशिष अरविंद चौबे याच्यावर २००८ व २०२३ मध्ये चोरी, जबरी चोरी, मारामारी, खंडणी, दुखापत यांसारखे मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यात व काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे दाखल आहेत.त्याला देखील परिसरातून तडीपार करण्यात आले आहे. या चारही आरोपींना पोलीस उपायुक्त परिमंडळ १ कार्यालयाने तडीपारीचे आदेश काढले आहेत. या चारही तडीपार इसमांना ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर, या जिल्हा कार्यक्षेत्रातून तडीपार करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -