घरक्राइम'मेरी'च्या क्लार्कचा राहत्या घरात संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ

‘मेरी’च्या क्लार्कचा राहत्या घरात संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ

Subscribe

पंचवटी : पंचवटीतील मेरी वसाहतीत राहत्या घरात एका ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह संशयास्पद आढळून आल्याचा प्रकार मंगळवारी (दि.१) रात्री उशिरा उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संजय वसंतराव वायकांडे (वय ३८, मेरी कॉलनी, दिंडोरी रोड, म्हसरूळ) मयत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय वायकांडे हा जलसंपदा विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. वायकांडे यांची माहेरी गेलेली बायको मंगळवारी (दि.१) सकाळी मुलांसमवेत आली असता ते घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. यावेळी पत्नी व मुलांनी तोंडावर पाणी मारून उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते काही प्रतिसाद देत नव्हते. शेजारच्यांची मदत घेत त्यांना जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मयत घोषित केले. शवविच्छेदन केले असता गळ्याभोवती काही खूना आढळून आल्या आहेत.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक युवराज पत्की, पंचवटी गुन्हे शोध पथक यांनी धाव घेतली. तसेच घटनास्थळी देखील पाहणी केली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मयताच्या पत्नीचा जबाब नोंदवून घेण्याचे व गुन्हा दाखल करण्याचे काम मंगळवारात्री उशिरापर्यंत सुरू होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -