घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजलजीवनच्या ठेकेदार, अधिकार्‍यांवर कारवाई करा

जलजीवनच्या ठेकेदार, अधिकार्‍यांवर कारवाई करा

Subscribe

श्रमजीवी संघटनेचे जिल्हा परिषदेला निवेदन

जलजीवनच्या ठेकेदार, अधिकार्‍यांवर कारवाई करा
श्रमजीवी संघटनेचे जिल्हा परिषदेला निवेदन

नाशिक । जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी या भागांत सुरु असलेली जलजीवन मिशनची कामे अर्धवट आणि अपुर्णावस्तेत तसेच निकृष्ट दर्जाची होत असल्याने संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन श्रमजीवी संघटनेेतर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, जिल्ह्यांतील आदिवासी तालुक्यांमध्ये श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा पंचनामा केला असता त्यात अनेक चुकीची कामे आढळून आली आहेत. अनेक ठिकाणी विहीरीला पाण्याचा स्त्रोत कमी असतांना देखील विहीरीची काम केलेले आढळून आले. जलजीवन मिशन अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या जलकुंभांची कामे देखील निकृष्ट दर्जाची आहेत. मात्र ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामे करुन बिले काढून घेत आहेत. त्यामुळे तीन फुटापेक्षा कमी पाईपलाईन टाकलेली असेल तर ती काढून टाकण्याचा इशाराही श्रमजीवी संघटनेने दिला आहे.

- Advertisement -

चोकट
बोध्दवस्ती, दलित वस्ती, आदिवासी पाडे हे गावापासून पाचशे ते हजार मीटरवर आहेत या वस्त्यांसाठी आराखडा तयार न केल्याने जलजीवन मिशनचे जलस्त्रोत या वस्त्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे पाड्यावरील महिलांना चार किलोमीटर पायपीट करुन कुटूंबासाठी पाणी आणावे लागते. तरी या समस्येतून आदिवासी महिलांची सोडवणूक व्हावी
– तानाजी शिंदे, श्रमजीवी संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -