घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदीड वर्षीय चिमुकल्याचा बादलीत बुडून मृत्यू

दीड वर्षीय चिमुकल्याचा बादलीत बुडून मृत्यू

Subscribe

राहत्या घरात खेळता- खेळता बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि.१५) अंबडमधील संजीव नगर परिसरात घडली. अलतमश सफीउल्ला अन्सारी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संजीव नगर भागातील मारुती मंदिरासमोरील घरात अलतमश घरात खेळत होता. यावेळी बाथरूममध्ये पाण्याची भरलेल्या बादलीत पाणी खेळत असताना अलतमशचे डोके पाण्याच्या बादलीत बुडाले. प्रसंगी पायवर व डोके खाली असा प्रकार झाला. यावेळी नाका तोंडात पाणी गेल्याने तो बेशुद्ध झाला. ही बाब घरातच झोपलेल्या आई-वडिलांना जाग आल्यानंतर लक्षात आली. चिमुकल्याला तात्काळ वडील सफीउल्ला अन्सारी यांनी उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अंबड औद्योगिक वसाहत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -