Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम देवदर्शनाच्या बहाण्याने त्र्यंबकेश्वरला नेले; शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन सराईत गुन्हेगाराने केला मुलीवर...

देवदर्शनाच्या बहाण्याने त्र्यंबकेश्वरला नेले; शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन सराईत गुन्हेगाराने केला मुलीवर बलात्कार

Related Story

- Advertisement -

नाशिक : देवदर्शनाच्या बहाण्याने त्र्यंबकेश्वरमधील हॉटेलमध्ये एका सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीवर शीतपेयातून गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पोस्कोचा गुन्हा दाखल करत संशयित रोहित आनंद म्हसदे (वय २५, रा.फुलेनगर, पंचवटी) यास अटक केली आहे. या घटनेने त्र्यंबकेश्वर परिसरातील लॉज व हॉटेलमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित रोहित म्हसदे हा सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर चोरी व मारहाणीची पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संशयित रोहित म्हसदे व पीडित अल्यवयीन मुलगी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रोहित म्हसदे व पीडित मुलीची आई एका कपड्याच्या दुकानात नोकरीस आहेत. त्यातून त्याची मुलीशी ओळख झाली. त्याने तिच्याशी ओळख वाढवली. तिला त्र्यंबकेश्वरला देवदर्शनासाठी जावू, असे त्याने तिला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून ती त्र्यंबकेश्वर जाण्यास तयार झाली. त्याने तिला पेठ रोडवरील उन्नती शाळेजबळ बोलावून घेतले. त्यानंतर दोघेजण रविवारी (दि.१८) त्र्यंबकेश्वर आले. रविवारी दुपारी एक वाजता त्र्यंबकेश्वरजवळील एका हॉटेलमध्ये त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषधे पाजले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डी. एस. पाटील करत आहेत.

- Advertisement -