घरताज्या घडामोडीलिंगदेव येथील बाधिताचा सरकारी अहवालही पॉझिटिव्ह

लिंगदेव येथील बाधिताचा सरकारी अहवालही पॉझिटिव्ह

Subscribe

जिल्ह्यात आणखी सहा बाधित; अकोले, श्रीरामपूर, पारनेर, नगरमधील रुग्णांचा समावेश

दोन दिवसांपूर्वी अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील खासगी लॅबमध्ये करोना बाधित आढळलेल्या व्यक्तीचा सरकारी अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. तर तालुक्यातील ढोकरीत देखील नव्याने बाधित रुग्ण आढळल्याने मुंबईतुन आलेल्यांमुळे अकोलेकर चिंतीत झाले आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यत पाच व्यक्ती करोनाबाधित आढळल्या असून हे सर्वजण मुंबईतुन आलेले आहेत. याशिवाय आधिच्या नगरमधील एका रुग्णाचा अहवालदेखील पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे.

नगरमधील आकडा दिवसेदिवस वाढत चालला असून बाधितांची संख्या ८० च्या घरात गेली आहे. जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमध्ये या व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासण्यात आले आहेत. त्यात या व्यक्ती बाधित असल्याचे शिक्कामोर्तब झाले. दोन दिवसांपुर्वी मुंबईतुन आलेल्या एका शिक्षकाला अकोले तालुक्यातील लिंगदेवमध्ये करोनाची बाधा झाली असल्याचे खासगी प्रयोगशाळेतील अहवालाने समोर आले होते. त्यामुळे या व्यक्तीला उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविले असता तेथे त्याचे पुन्हा स्त्राव घेण्यात आले होते. अखेर हे सरकारी अहवालदेखील प्रशासनाला उपलब्ध झाले असून ही व्यक्ती करोनाबाधित असल्याचे शिक्कामोर्तब झाले.

- Advertisement -

याशिवाय ढोकरी (अकोले) येथील पस्तीस वर्षीय युवक, नगर तालुक्यातील वाकोडी येथील ४३ वर्षीय पुरुष आणि निंबळक येथील तीस वर्षीय महिला, पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथील ३१ वर्षीय पुरुष आणि श्रीरामपुर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ३३ वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली असल्याचे अहवालातुन समोर आले आहे. नोडल अधिकारी डॉ. बापुसाहेब गाढे व जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांनी ही माहिती दिली.

सुरुवातीपासूनच करोनामुक्त असलेल्या अकोले तालुक्यातदेखील करोनाने शिरकाव केला असून निसर्गसंपन्न अकोले तालुक्यातदेखील मुंबईकरांमुळे करोनाचे संकट गदड झाले आहे. दरम्यान अकोले तालुका प्रशासनाकडून यासंदर्भात वस्तुस्थितीची माहिती दिली जात नसल्याने विविध चर्चा तालुक्यात सुरु असतात. यामुळे करोनापेक्षा अफवांचेच पिक तालुक्यात जास्त निर्माण होण्याची शक्यता असल्याने तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सद्यस्थिती माध्यमांना सांगणे आवश्यक आहे. अनेकदा अधिकारी कातडी बचाव भूमिका घेत आपले मोबाईलदेखील बंद करत असल्याच्या तक्रारी आहेत.

- Advertisement -

संगमनेरच्या वनकुटे येथील महिलेचा मृत्यू

मुंबईत आपल्या मुलाकडे गेलेल्या संगमनेर तालुक्यातील वनकुटे येथील महिलेला तेथून परतल्यावर त्रास होऊ लागल्याने तिला आरोग्य विभागाने तपासणीसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. मुंबईत तिचा मुलगा व सून पॉझिटिव्ह असल्याने प्रशासनाने यासंदर्भात सतर्कता बाळगत तिची तपासणी केली होती. मात्र रविवारी तिचे करोना अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे प्रशासनाने सुस्कारा सोडला. दरम्यान या ६५ वर्षीय महिलेचा रविवारी रात्री जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेला मधुमेह आणि ब्लॅडप्रेशरचा त्रास होता. त्यामुळे तिचा मृत्युसंदर्भातही करोनाचे प्रश्नचिन्ह निर्माण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -