दोन दिवस सराफ बाजार बंद

gold rate fall continue today
Today Gold Rate: सोन्याच्या भावात कमालीची घसरण, चांदी महागली

करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक सराफ असोसिएशनने २० व २१ मार्च रोजी सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सराफ असोसिएशन अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दिली.

नासिक सराफ असोसिएशनच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात करोना प्रतिबंधाबाबत जिल्हा प्रशासनासह पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत २० व २१ तारखेला शहरातील सर्व सराफी पेढ्यांनी व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, २१ तारखेनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ज्या सूचना येतील त्यांचे पालन सर्व सभासदांनी करावे, असे आवाहनही नाशिक सराफ असोसिएशनने केले आहे. करोना हा राष्ट्रीय नव्हे तर जागतिक आरोग्याचा प्रश्न असल्याने सर्वांनी काळजी घ्यावी व सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. त्याचप्रमाणे दोन दिवस सराफ बाजार बंद ठेवल्यामुळे ग्राहकांना होणार्‍या त्रासाबद्दल सराफ असोसिएशनने दिलगिरीही व्यक्त केली. या बैठकीला असोसिएशनसह सिडको सराफ असोसिएशन, पंचवटी सराफ असोसिएशन, तसेच नाशिकरोड सराफ असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.