वाहनचोरीची माहिती १ मेपासून संकेतस्थळावर

जिल्ह्यात वाहनचोरीच्या घटनेत वाढ; नाशिक ग्रामीण पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

Jawa’s delivery estimator updated on website
ग्राहकांसाठी खास जावा मोटरसायकलने सुरू केली नवी सेवा

नाशिक जिल्ह्यात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हरवलेली वाहने वाहनमालकांना परत मिळावी, यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात ३९ पोलीस ठाण्यात असलेल्या बेवारस वाहनांची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस १ मे २०२२ पासून संकेतस्थळावर उपलब्ध करणार आहेत. त्यामुळे वाहनमालकांना त्यांच्या मालकीची वाहने परत मिळणार आहेत.

पोलीस ठाण्यात शेकडो वाहने विविध गुन्ह्यांत पोलीस जप्त करतात. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षे मालकांच्या प्रतिक्षेत धूळखात पडून आहेत. नाशिक शहरात २०१८ मध्ये ५६९, २०१९ मध्ये ५०५, २०२० मध्ये ७१७, २०२१ मध्ये ४६० आणि जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत १६० वाहनांची चोरी झाली आहे. वाहनचोरीच्या वाढत्या घटनांमुळे अनेकदा गुन्हे उशिराने दाखल होतात. संबंधीत वाहनधारकास पोलीस ठाण्यात चक्करा माराव्या लागतात. चोरी गेलेल्या वाहनाच्या मदतीने गंभीर गुन्हे झाल्यास त्याचा मनस्ताप वाहनधारकांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस हायटेक झाले आहेत.

इंटरनेटच्या मदतीने वाहनधारक घरबसल्या वाहनचोरीची तक्रार नोंदवू शकणार आहेत. तक्रार नोंदवल्यानंतर तपासाबाबतची माहितीही वाहनधारकास समजणार आहे. https://www.nashik ruralpolice.gov.in/ या संकेतस्थळावर वाहनमालकांना हरवलेल्या वाहनांची माहिती मिळेल. वाहनचोरीची किंवा हरवल्याची तक्रार नोंदवताना वाहनधारकास वाहनाचा प्रकार, चेसी क्रमांक, इंजिन क्रमांक, वाहन हरवले किंवा चोरी गेले ते ठिकाण आदी माहिती द्यावी लागणार आहे.