घरमहाराष्ट्रनाशिकशालेय विद्यार्थ्यांमार्फत मतदारांना देणार प्रश्नावली

शालेय विद्यार्थ्यांमार्फत मतदारांना देणार प्रश्नावली

Subscribe

नाशिक जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक प्रश्नावली तयार केली असून ही प्रश्नावली शालेय विद्यार्थ्यांमार्फत पालकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. नागरिकांनी ही प्रश्नावली भरून दिल्यास मतदारयादी अधिक परिपूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला आहे.

मतनाचा टक्का वाढावा आणि एकही मतदार मतनापासून वंचित राहू नये याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. दोन महीन्यांवर येउन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी सुरू केली असून मतदार यादी दोषविरहीत करण्याकरीता विशेष मोहीमेव्दारे यादी शुध्दिकरण करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य असून, पालकांशी संवाद साधून विद्यार्थी भरून आणू शकतील अशी प्रश्नावली जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तयार केली आहे.

- Advertisement -

ही प्रश्नावली कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने भरावयाची असून, ती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पुन्हा शाळेत जमा करावयाची आहे. तेथून ती तहसील कार्यालयांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे. प्रश्नावलीत पालकाचे नाव, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी, विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव, तालुका, जिल्हा ही माहितीही घेण्यात येणार आहे. सोशल मीडियावरूनही ही प्रश्नावली अधिकाधिक नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचविणार आहोत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

…अशी आहे प्रश्नावली

  • आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट आहे का?
  • कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत का?
  • १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण होऊनही मतदार यादीत नाव नाही अशी व्यक्ती कुटुंबात आहे का?
  • मतदार यादीत नाव, पत्ता, वय, लिंग इत्यादी तपशील बरोबर आहे का?
  • कुटुंबात दिव्यांग मतदार आहे का? त्याची माहिती बीएलओंना दिली आहे का?
  • कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत झाली असल्यास तिचे नाव मतदार यादीतून वगळले आहे का?
  • आपले नाव मतदार यादीत कुठल्या यादीभागात कुठल्या क्रमांकावर आहे?
  • लोकसभा निवडणुकीत आपण मतदान केले का?
  • विधानसभा निवडणुकीत आपण मतदानाचा हक्क बजावणार का?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -