घरमहाराष्ट्रनाशिकतरुण शेतकर्‍याचा ‘किसान जिंदा प्लॅन’

तरुण शेतकर्‍याचा ‘किसान जिंदा प्लॅन’

Subscribe

राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव यांसारख्या समस्यांना कंटाळून शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. या समस्येतून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी देवरगाव (ता. चांदवड) येथील तरुण शेतकरी विनायक शिंदे यांनी ‘किसान जिंदा प्लॅन’ ही संकल्पना तयार केली आहे. शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी तयार केलेली संकल्पना केंद्र व राज्य सरकारने राबवावी, अशी मागणी केली आहे.

प्राथमिक गरजा पूर्ण करताना शेतकर्‍यांना संघर्ष करावा लागतो. या समस्येतून बाहेर काढण्यासाठी सरकारने ‘किसान जिंदा प्लॅन’च्या माध्यमातून १ लाख रुपयांपर्यंतची पत (क्रेडिट) शेतकर्‍यांना उपलब्ध करून द्यावी. शेतकरी या निधीतून आपल्या दैनंदिन गरज भागवतील. तसेच, योजनेतील कार्डाच्या माध्यमातून विशिष्ट वस्तूंच्या खरेदीसाठी मर्यादा निश्चित करता येईल.’’

- Advertisement -

‘‘अनेकदा पैसे नसल्याने किराणा, आजारपण, शेतीसाठी आवश्यक खते व साहित्य यांसाठी अडचण निर्माण होत असते. मात्र, या माध्यमातून पर्याय निघू शकतो. शेतमाल विक्री ऑनलाइन पद्धतीने केली जावी. यातून आलेले पैसे केलेल्या खर्चात वर्ग करून उर्वरित रक्कम थेट शेतकर्‍याच्या खात्यावर जमा करता येईल,’’ असे शिंदे म्हणाले ‘‘अनेकदा शेतकरी अडचणीत असताना बँक व सोसायटीच्या माध्यमातून अर्थसाह्य घेतो. त्यामुळे व्याज भरताना त्याची दमछाक होते, तर कधी अर्थसहाय्यही मिळत नसल्याने तो मानसिक तणावात असतो. त्यामुळे या ‘किसान जिंदा प्लॅन’च्या माध्यमातून त्याला आधार होऊ शकतो,’’ असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

‘किसान जिंदा प्लॅन’ची वैशिष्ट्ये

  • कर्ज पुरवठ्याअभावी शेती अडचणीत येणार नाही
  • मूलभूत खर्चाकरता भांडवल उपलब्ध
  • विशिष्ट व गरजेच्या वस्तूंची खरेदी
  • क्रेडिट कार्डचा गैरवापर टाळणे शक्य
  • कार्डच्या माध्यमातून पिकांची ऑनलाइन नोंद
  • या माध्यमातून पिकांच्या लागवडीचा अंदाज येणार
  • शेतमालाचे आयात निर्यात धोरण ठरवणे शक्य
  • सरकारच्या तिजोरीवर ताण कमी होणार
  • शेतकरी यातून सक्षम होईल.
  • शेतकर्‍यांची विविध वित्तीय संस्थांकडून होणारी लूट थांबेल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -