घरताज्या घडामोडीहर्बल तंबाखू सप्लाय बंद झाल्याने मलिकांचे मानसिक संतुलन बिघडलं, आशिष शेलारांचा पलटवार

हर्बल तंबाखू सप्लाय बंद झाल्याने मलिकांचे मानसिक संतुलन बिघडलं, आशिष शेलारांचा पलटवार

Subscribe

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सरकारमध्ये घेऊन खंडणी गोळा करण्याचा प्रकार सुरु होता असा आरोप मलिकांनी केला आहे. मलिकांच्या आरोपांवर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देताना घणाघात केला आहे. मलिकांचा हर्बल तंबाखूचा सप्लाय बंद झाल्यामुळे मानसिक संतुलन बिघडलं आहे. मलिकांनी मानसिक स्थिती चांगली ठेवावी असे खोचक वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे. तसेच फडणवीसांवर कऱण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसून मलिकांना लवंगीही फोडता आली नाही असे शेलार म्हणाले.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी खंडणी आणि अंडरवर्लडशी संबंधी आरोप केले आहेत. याच आरोपांवर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शेलार म्हणाले की, नवाब मलिकांनी मुन्ना यादव, हजी हैदर, रियाज भाटी, हाजी हरफात आणि समीर वानखेडे यांची नावे घेऊन मोठं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हा प्रयत्न विफल ठरला आहे. याचा संबंध मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये काहीच तथ्य नाही असे आशिष शेलार म्हणाले.

- Advertisement -

फडणवीसांवर आरोप लावू शकले नाही

आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की संपुर्ण यंत्रणा लावूनसुद्धा नवाब मलिक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करु शकले नाही असे शेलार म्हणाले. तसेच हो हे खरं आहे की, मुन्ना यादव, हाजी हराफत, हाजी हैदर पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांना विविध मंडळांमध्ये बसवलं आहे. त्यांच्यावर कोणतेही गुन्हे नाहीत त्यांची चौकशी केल्यावर नेमणूक कायदेशीर झाली होती असे प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी दिलं आहे. तर मुन्ना यादव यांच्यावर एक आरोप त्यांचे स्पष्टीकरण करतील. यामध्ये राष्ट्रवादीचे कनेक्शन हे स्वतः सांगतील असेही शेलार म्हणाले.

गुन्हेगारांना राजाश्रय हा तुमचा धंदा

राज्यातील मागील २ वर्षांपासून तुमचे सरकार आहे. विशेषता तुमच्या पक्षातील नेत्यांकडेच गृहमंत्री पद आहे. हजी हराफत आणि हैदर यांच्यावर साधा अदखलपात्र गुन्हा नाही. असतील तर ते आंदोलनाची केसेस असतील गुन्हेगारांना राजाश्रय असा तुमचा धंदा आहे. नोटबंदीमध्ये कोणताही काळाबाजार झाला नाही असे शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

इमरान आलम शेख राष्ट्रवादीचा नेता

राज्यात १४ कोटी ५६ लाख रुपयांचे बनवाट नोटांचे प्रकरण घडलं असल्याचे मलिकांनी सांगितले. तसेच यामध्ये इमरान आलम शेख हा हाजी हराफतचा भाऊ होता असे सांगितले. तर तो काँग्रेसचा तत्कालीन सचिव होता. तेव्हा त्याला अटक करण्यात आली होती. आता तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

मानसिक संतुलन शांत करावं

नवाब मलिकांचे मानसिक संतुलन बिघ़डतयं की काय अशी शंका निर्माण झाली असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. कदाचित हर्बल तंबाखूचा सप्लाय संपला आहे की काय असा खोचक सवाल शेलार यांनी केला. तसेच नवाब मलिकांनी मानसिकरित्या स्वताला शांत करा राजकारण आपल्या जागी आहे. जावयाच्या प्रेमापोटी स्वतःचं म्हणणे खरं करण्यासाठी राजकारणाच्या नीच पातळीवर जाऊ नका असेही शेलारांनी सांगितले. एक नवीन नीच पातळीचे वर्णन करायचे झाले तर नवाबी पातळी असे करता येईल या पातळीपर्यंत आपण जाऊ नये अशी आमची इच्छा असल्याचे शेलार म्हणाले.


हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचे बनावट नोटांचे रॅकेट; नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -