घरताज्या घडामोडीपवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर नवाब मलिकांच्या दोन्ही मुलींना अश्रू अनावर

पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर नवाब मलिकांच्या दोन्ही मुलींना अश्रू अनावर

Subscribe

मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझा सांगाती…या पुस्तकाचा प्रकाश सोहळा पार पडला. परंतु या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शरद पवारांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं घोषित केलं. त्यांच्या या घोषणेनंतर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या नेत्यांना अश्रू अनावर झाले.

या कार्यक्रमासाठी नवाब मलिक यांच्या दोन्ही मुलींनी उपस्थिती लावली होती. मलिक यांचं कुटुंब सध्या अनेक अडचणीतून जात आहे. नवाब मलिक यांना जामीन मिळणं कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. त्यामुळे पवारांनी अचानक घोषणा केल्यानंतर नवाब मलिकांच्या सना मलिक शेख आणि
निलोफर मलिक खान या दोन्ही मुलांना रडू कोसळलं.

- Advertisement -

काय म्हणाल्या नवाब मलिकांच्या मुली?

आम्ही नवाब मलिक यांच्या मुली आहोत. आपल्याला विनंती करायला आलो आहोत की, आमच्या वडिलांच्या गैरहजेरीत तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहात. आपण कृपया करुन आपला निर्णय मागे घ्या आणि आमच्यासोबत आपण जसे उभे आहात तसेच उभे राहा, असं मलिक यांच्या मुली म्हणाल्या.

- Advertisement -

राजकारण आणि राष्ट्रवादीला तुमची गरज – नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आण‍ि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या अध्‍यक्षपदी सुध्‍दा हवेत , असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले की, 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून 24 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील 1 मे 19960 पासून सुरु झालेला हा संपूर्ण प्रवास गेली 63 वर्षे अविरत सुरु आहे. यातील 56 वर्षे मी कुठल्या सभागृहात सदस्य म्हणून काम केलं आहे. राज्यसभेची पुढची तीन वर्षे राहिली आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या अधिकाधिक प्रश्नांवर लक्ष घालण्यावर माझा भर असेल, असंही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, आपल्याला माहिती आहे, माझा अनेक संस्थांशी कामकाजामध्ये सहभाग आहे. रयत शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान, मराठा मंदीर मुंबई, महात्मा गांधी सर्वोदय संघ, अशा अनेक संस्थांच्या कामकाजामध्ये माझा सहभाग आहे, या कार्यांवर मी अधिक भर देणार आहे, असंही शरद पवार म्हणाले.


हेही वाचा : राजकारण आणि राष्ट्रवादीला तुमची गरज; केंद्रीय मंत्र्यांचं शरद पवारांच्या राजीनाम्यावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -