घरताज्या घडामोडीखाणीचा विस्तार रद्द करावा नाहीतर.., अधिवेशनापूर्वी नक्षलवाद्यांचा राज्य सरकारला इशारा

खाणीचा विस्तार रद्द करावा नाहीतर.., अधिवेशनापूर्वी नक्षलवाद्यांचा राज्य सरकारला इशारा

Subscribe

नागपुरात हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. यावेळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र, नक्षलवाद्यांकडून राज्य सरकारला अधिवेशनापूर्वीच इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार त्वरित रद्द करण्यात यावा, असा इशारा नक्षलवाद्यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या पश्चिम सब जोनल ब्यूरोने आज एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे. जर सरकार सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार रद्द करणार नसेल, तर आदिवासींचा हित पाहणाऱ्या सर्व घटकांनी एकत्रित येऊन सरकार विरोधात जनसंघर्ष उभारावा, असं आवाहन नक्षलवाद्यांनी पत्रकातून केलं आहे.

- Advertisement -

सुरजागडच्या ठिकाणी आदिवासींचं पूजा स्थळ आहे. असे असतानाही स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता 2014 मधील भाजप सरकारने स्थानिक आदिवासींच्या तत्कालीन जनसंघर्षाला चिरडून टाकत खाणीचं खोदकाम सुरू केलं होतं. त्यामुळे परिसराची प्रचंड पर्यावरणीय हानी होत असून सर्व प्रकारचं प्रदूषण ही वाढलं आहे.

दरवर्षी तीन मॅट्रिक टन लोह खनिज काढण्याची परवानगी असताना आता सरकारने दर वर्षी दहा मॅट्रिक टन लोह खनिज काढण्याची परवानगी बहाल केली आहे. या विस्तारीत प्रकल्पासाठी जवळपास 1000 एकर जमीन खाणीसाठी दिली जात आहे. सुरजागड खाणीमुळे शेतकऱ्यांचे पीक खराब होत असून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शिवाय खाणीतून निघणाऱ्या ट्रक्समुळे अनेक रस्ते अपघात होऊन अनेकांचा जीव जात आहे, असं पत्रकातून नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

काल झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीलाही नक्षलवाद्यांनी टार्गेट केलं आहे. तेंदूपत्तावरील जीएसटीमध्ये सूट देण्याची मागणीही अनेक वर्षांपासून केली जात आहे. ओडिसा सरकारनेही तशीच मागणी केली आहे. मात्र, या बैठकीत या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : देशात मुंबई सगळ्यात उष्ण शहर, हवामान खात्याकडून अलर्ट जारी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -