घरमहाराष्ट्रस्वायत्त संस्था आणि गांधी कुटुंबावरील हल्ला लोकांनी स्वीकारला नाही - शरद पवार

स्वायत्त संस्था आणि गांधी कुटुंबावरील हल्ला लोकांनी स्वीकारला नाही – शरद पवार

Subscribe

सर्वोच्च न्यायालय, सीबीआय आणि रिझर्व्ह बँक यासारख्या घटनात्मक संस्थावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न भाजपने आपल्या राजवटीत केला. तसेच प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी नेहरू-गांधी परिवारावर एकतर्फी हल्ला चढवला होता. हा हल्ला लोकांना पसंत पडला नसल्याचे कालच्या निकालावरुन स्पष्ट होत असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.

मध्य प्रदेशात बसपा – सपाने साथ द्यावी

ज्या पाच राज्यात निवडणुका झाल्या तिथे राष्ट्रवादी पक्षाला मर्यादा होत्या. अन्यथा आम्ही काँग्रेससोबत उभे राहिलो असतो. मात्र मायावतींच्या बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला काही जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत जावे, अशी भूमिका पवार यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

मोदींच्या प्रचाराची पातळी घसरली

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रचारावर देखील पवार यांनी टीका केली आहे. “प्रधानमंत्र्यांनी प्रचार करताना काही मर्यादा पाळणे गरजेचे असते. मात्र या निवडणूकीत त्यांचा हल्ला चुकीच्या ठिकाणी होता. व्यक्तिगत टीका टिप्पणी ते करत राहिले. एका कुटुंबाला वारंवार टार्गेट करण्याचे काम त्यांनी केले. मात्र २०१४ साली त्यांनी दिलेली स्वतःची आश्वासने ते विसरून गेले. त्याबद्दल ते प्रचारात काहीच बोलले नाहीत. मोदी वारंवार गांधी परिवारावर हल्ला करत असल्यामुळे लोकांनाही त्याचा अचंबा वाटला आणि त्यांनी ते स्वीकारले नाही.”

“आजच्या तरुण पिढीने नेहरू आणि इंदिरा गांधी यांना पाहिलेले नाही. त्यांनी मोदींनी २०१४ साली दिलेली आश्वासने मात्र ऐकली आहेत. त्यामुळे आश्वासने सोडून नेहरू-गांधी परिवारावरची मोदी यांची टीका तरुणांना भावली नाही.”, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. प्रधानमंत्र्यांनी “तुम्हाला बघून घेतो, तुम्हाला दाखवतो”, अशा प्रकारच्या धमक्या भाषणात दिल्या. मात्र याचा प्रतिकूल परिणाम भाजपवरच झाल्याचे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

भाजप राजवटीत स्वायत्त संस्था धोक्यात

सत्ता हस्तगत केल्यापासून भाजपने स्वायत्त संस्थावर हल्ला चढवायला सुरुवात केली, त्यावरही लोकांची नापसंती दर्शवली आहे. कधी नव्हे ते सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत आपली व्यथा मांडली. रिझर्व्ह बँकेवरही हल्ला केला. त्यामुळे तीन वर्षांचा कालावधी असतानाही भाजपनेच नेमलेले गर्व्हनर उर्जित पटेल यांनी राजीनामा देऊन देणे पसंत केले. सीबीआयच्या संचालकांनाही अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे या स्वायत्त भविष्य भाजपच्या राजवटीत काळजी करण्यापर्यंत आलेले आहे, असा माझा निष्कर्ष असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -