घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजितदादांचे प्रत्युत्तर, म्हणाले, ज्यांच्यामध्ये कुवत नाही, ताकद नाही...

पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजितदादांचे प्रत्युत्तर, म्हणाले, ज्यांच्यामध्ये कुवत नाही, ताकद नाही…

Subscribe

यावेळी अजित पवार यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत म्हटले की,  देशाने आजपर्यंत खूप काही गोष्टी साध्य करणायचा प्रयत्न केला. अजून काही साध्य करण्याच्या बाकी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशावासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी घराणेशाही आणि भ्रष्ट्राचारावरून विरोधकांवर जहरी टीकास्त्र डागले. काका- पुतण्या आणि कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढण्याची गरज असल्याचेही मोदींनी नमुद केले. मोदींच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांच्यात कुवत नाही, ताकद नाही, कर्तृत्व नाही, नेतृत्त्व नाही, अशांना बळजबरीने पदावर बसले तर त्याला घराणेशाही म्हणू शकतो, पण एखाद्या घरामध्ये जन्मलेली पुढची पिढी कर्तृत्त्ववान असेल, त्यांच्या विभागातील जनतेने त्यांना आमदार-खासदार केलं असेल, तर त्याला घराणेशाही म्हणणे चुकीचे ठरेल, असं अजित पवार म्हणाले आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई-राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अजित पवारांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेला उत्तर देत म्हटले की, बहुमताने जनतेने निवडूण दिलं असेल तर घराणेशाही कशी लोकशाहीत कुणीही घराणेशाही आणू नये. भ्रष्टाचारांचं समर्थन कुणीही करू नये. घराणेशाही – घराणेशाही असं म्हटलं जातं. ज्यांच्यामध्ये ज्यांच्यात कुवत नाही, ताकद नाही, कर्तृत्व नाही, नेतृत्त्व नाही, अशांना बळजबरीने पदावर बसले तर त्याला घराणेशाही म्हणू शकतो, पण एखाद्या घरामध्ये जन्मलेली पुढची पिढी कर्तृत्त्ववान असेल, त्यांच्या विभागातील जनतेने त्यांना आमदार-खासदार केलं असेल, तर त्याला घराणेशाही म्हणणे चुकीचे ठरेल. आजपर्यंत आपण पाहिलं की, जर कोणी चांगल काम करत असले तर जनता त्यांना निवडून देते. लोकांनी त्यांना निवडूण दिले तर लोकशाहीत ते निवडून जाऊ शकतात. घराणेशाही संपली पाहिजे असं बोललं जातं. पण जनतेने निवडून दिलं तर घराण्यातील लोकही निवडून येतात.

हेही वाचा : सर्वाधिक बेईमानी आमच्याशी झाली, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेना दिला दुजोरा

- Advertisement -

यावेळी त्यांन पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा दिला
पंडित जवाहरलाल नेहरू यांची कारकिर्दीनंतर इंदिरा गांधी यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली, एक शक्तीशाली स्त्री म्हणून इंदिरा गांधींनी आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यांनी भारतात संगणक युग आणले. मिस्टर क्लीन अशी त्यांची प्रतिमा होती. असही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

यावेळी अजित पवार यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत म्हटले की,  देशाने आजपर्यंत खूप काही गोष्टी साध्य करणायचा प्रयत्न केला. अजून काही साध्य करण्याच्या बाकी आहे. जाती- जातीमध्ये सलोखा ठेवायचा आहे. आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे मी फार खोलात जात नाही असे अजित पवार म्हणाले.

घराणेशाही, परिवाद वादावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींनी घराणेशाही, परिवाद वादावर निशाणा साधत म्हटले की, काका- पुतण्या आणि कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढा देणे गरजेचे आहे. मी ज्यावेळी काका-पुतण्याशाही घराणेशाहीचा उल्लेख करतो तेव्हा लोकांना वाटते की मी फक्त राजकीय क्षेत्राबद्दल बोलत आहे. पण नाही. दुर्दैवाने राजकीय क्षेत्रातील ही दुष्टाई देशातील प्रत्येक संस्थेत शिरली आहे. त्यामुळे माझ्या देशाच्या प्रतिभेला तडा जाते. माझ्या देशाच्या ताकदीचा त्रास होतो.प्रत्येक संस्थेत त्याबद्दल द्वेषाची भावना निर्माण केली पाहिजे. संस्थांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. राजकारणातही कौटुंबिक राजकारणाने खूप नुकसान झाले आहे. मात्र हे कौटुंबिक राजकारण कुटुंबासाठी असते, त्याचा देशाशी काही संबंध नसतो. यामुळे भारताचे राजकारण शुद्ध करूया, भारतातील सर्व संस्थांच्या शुद्धीकरणासाठी गुणवत्तेच्या जोरावर देशाचा विकास करावा लागेल.


हेही वाचा : सर्वांच्या मनात सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या योजना राबवणार, उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -