घरमहाराष्ट्रगोसावीच्या बॉडीगार्डने NCB विरोधात केलेल्या आरोपाची SIT चौकशी करा, मलिकांची मागणी

गोसावीच्या बॉडीगार्डने NCB विरोधात केलेल्या आरोपाची SIT चौकशी करा, मलिकांची मागणी

Subscribe

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आर्यन खानच्या सुटकेसाठी मध्यस्था मार्फत २५ कोटींची मागणी झाल्याचा आरोप पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. या आरोपांमुळे आता एकचं खळबळ उडाली आहे. तर एनसीबीच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. यावर आता अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दखल घेत एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तसेच गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना भेटून ही मागणी करणार असल्याचे मलिकांनी सांगितले आहे.


एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले की, समोर आलेलं प्रकरण गंभीर आहे. मी सुरुवातीपासून बोलतोय एनसीबीच्या एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून.. संपूर्ण यंत्रणा चुकीचे आहे? ते कारवाई चुकीची करताय? तर नाही. ज्या दिवसापासून समीर वानखेडे या डिपार्टमध्ये आलेत तेव्हापासून त्यांनी खोट्या केसेसं बनवायल्या सुरुवात केली. तसेच फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करुन प्रसिद्ध मिळवून द्यायची आणि त्या माध्यमातून दहशत निर्माण करायची. मोठं वसूलीचे रॅकेट मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीत सुरु झाल्य़ाचे मी वारंवार सांगतोय. परंतु समोर आलेला विषय अतिशय गंभीर आहे.  फिल्म इंडस्ट्रीत एक केस रजिस्टर झाली. पण एकालाही अटक झाली नाही, एक वर्षापासून केसस पडून आहेत. म्हणजे गोसावीच्या माध्यमातून पैसे वसुली सुरु झालेली आहे. या लोकांनी हजारो कोटी रुपये वसूल केले आहेत. याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली पाहिजे. एसआयटी नेमूण मुंबईतील बॉलिवूडमधील दहशत निर्माण करणाऱ्या वसूली रॅकेटची चौकशी झाली पाहिजे जेणेकरुण सर्व सत्य बाहेर येईल. उद्या रात्री मुंबईत आल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस आयुक्तांना भेटून ही मागणी करणार आहे, असं मलिक यांनी सांगितलं.

- Advertisement -

प्रभाकर साईल यांचा व्हिडिओ षडयंत्र असल्याचा दावा भाजपाने केला होता. यावर प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले की, भाजपाला काहीही बोलू द्या. साईल स्वत: सांगतोय तो गोसावीचा बॉडीगार्ड आहे. गोसावी आणि भानुशालीचा व्हिडिओ काढल्यानंतर एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ९ लोकांची नावं घेतली होती. त्यात हा पहिला नंबरचा पंच आहे… पंच यांनीच आणले आणि यांनीच ठरवले. प्रभाकर साईल गोसावीचा बॉडीगार्ड आहे. त्याने गौप्यस्फोट केल्यानंतर हे षडयंत्र असल्याचे सांगतायत. त्यामुळे आमची मागणी आहे. चौकशी होऊ द्या. त्यामुळे यांनी इतरांकडूनही पैसे घेतले आहेत हेही बाहेर येईल असंही मलिक म्हणाले.

संघटीत गुन्हेगारी सुरु आहे. याची दखल घेत एसआयटीमार्फत चौकशी सुरु झाली पाहिजे. कारण परमबीर सिंगसारखी माणंस अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांना लगाम घातला पाहिजे, असाही आरोप मलिकांनी केला आहे.

- Advertisement -

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -