घरमहाराष्ट्रप्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, तीन दिवस होणार उपचार

प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, तीन दिवस होणार उपचार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत एक निवेदन जाहीर केले आहे. त्यानुसार 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार आहेत. (ncp leader sharad pawar admitted to mumbai breach candy hospital)

शरद पवारांना प्रकृतीच्या कारणास्तव ब्रीच कँडी रुग्णालयात केले दाखल
शरद पवारांना प्रकृतीच्या कारणास्तव ब्रीच कँडी रुग्णालयात केले दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराज गर्जे यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनानुसार, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ते ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल. तसेच त्यांचे नियोजित कार्यक्रमही वेळेत होणार आहेत.

- Advertisement -

या निवेदनात पवारांच्या नियोजित कार्यक्रमांबद्दल म्हटले आहे की, 3 नोव्हेंबर रोजी ते शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 4 आणि 5 नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी “राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा” या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात शरद पवार उपस्थित राहून कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. या शिबिरामध्ये शरद पवार यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते देखील मार्गदर्शन करणार आहेत.

- Advertisement -

शरद पवार यांनी यापूर्वी 11 एप्रिल 2022 रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 12 एप्रिल रोजी त्यांच्यावर पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली, यावेळी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 15 एप्रिल रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यावेळी 15 दिवसांच्या काळात शरद पवार यांच्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्याआधी 30 मार्च 2022 ला त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सात दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परत 12 एप्रिलला पुन्हा एकदा त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीच शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती. अशात आता पुन्हा शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


‘या’ कारणासाठी किशोरी पेडणेकर घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -