घरमहाराष्ट्र'या' कारणासाठी किशोरी पेडणेकर घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट

‘या’ कारणासाठी किशोरी पेडणेकर घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट

Subscribe

राज्यातील राजकीय सत्तांतरणानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. यामुळे शिवसेनेत बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन गट पडले. दरम्यान आता ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. पेडणेकरांच्या या भेटीमुळे आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडून पेडणेकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मुंबईच्या वरळीतील एसआरए प्रकल्पात पेडणेकरांनी भ्रष्टाचार केल्याचा किरीट सोमय्यांचा दावा आहे. मात्र पेडणेकरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशा परिस्थितीत पेडणेकरांची मुख्यमंत्री शिंदेंसोबतची भेट चर्चेचा विषय ठरत आहे.

शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटातील एखादा नेता एकनाथ शिंदे यांना भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनेक जण भेट राजकीय आहे की वैयक्तित यावर आपापली मतं व्यक्त करत आहेत. पण किरीट सोमय्यांकडून सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे आपण शिंदेंना भेटणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले आहे. या भेटीची तारीख आणि वेळ अद्याप ठरलेली नाही.

- Advertisement -

या भेटीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही परवानगी दिली आहे. यानंतर आता किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहेत. पेडणेकर यांच्या सासूबाई विजया पेडणेकर यांचे काल ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आपल्यावर होणाऱ्या आरोपांमुळे वयस्क विजया पेडणेकर यांनी धसका घेतला आणि त्यांचा मृत्यू झाला, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.


राज्यात मोठा प्रकल्प येईल असा लॉलीपॉप दाखवला जातोय, सॅफ्रन कंपनी गेल्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -