घरताज्या घडामोडीSavitribai Phule : सावित्रीबाई फुलेंची पुन्हा बदनामी, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Savitribai Phule : सावित्रीबाई फुलेंची पुन्हा बदनामी, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Subscribe

मागील काही महिन्यांपासून राज्यात महापुरुषांची बदनामी करण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule ) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. मात्र, महापुरुषांची बदनामी करण्याचं सत्र हे थांबण्याचं नावच घेत नाहीये. आता एका इंग्रजी वेबसाईटने देखील समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण केलं आहे. हे लिखाण आक्षेपार्ह असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) मुंबईत आंदोलन केलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईत आंदोलन

सावित्रीबाई फुले यांच्या अवमान प्रकरणी ‘इंडिक टेल्स’ (Indic Tales) या वेबसाईट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्यावतीने मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर कठोर कारवाई करण्याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. हे अत्यंत वेदनादायी असून छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा प्रकार हा अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असं निवेदनात म्हटलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र सदनातून सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवला

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीकरता महाराष्ट्र सदन सजवण्यात आलं होतं. यावेळी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे तात्पुरते हटवण्यात आल्याची बाब महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती.

- Advertisement -

अभिनेता ओमकार गोवर्धनची ‘ती’ पोस्ट चर्चेत 

मागील काही दिवसांपूर्वी मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता ओमकार गोवर्धन याने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल चुकीचं लिहिणाऱ्या एका इंग्रजी वेबसाइटविरुद्ध आवाज उठवला होता. मुलींच्या शिक्षणासाठी स्वतः दगड खाणाऱ्या सावित्रीबाईंबद्दल इतकं चुकीचं लिहिलं जातं आणि आपण फक्त बघत राहतो यावर त्याने नाराजी व्यक्त केली होती. खरं म्हणजे ही बाब ओमकार गोवर्धन याने दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आणली होती. त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटायला सुरूवात झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Omkar Govardhan (@omkargovardhan)

माजी राज्यपालांकडून सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

१४ फेब्रुवारी २०२२ रोजी पुण्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात भाषण करताना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फुलेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, कल्पना करा की सावित्री बाईंचं लग्न १० व्या वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे १३ वर्ष होतं. कल्पना करा की, मुलगा-मुलगी लग्नानंतर काय करत असतील… लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील… असं वक्तव्य माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यामुळे राज्यपालांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.


हेही वाचा :क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळे हटवण्याची हिम्मतच कशी झाली; छगन भुजबळ संतापले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -