Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी MP Sanjay Raut : मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण, पण जनतेच्या 'या'...

MP Sanjay Raut : मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण, पण जनतेच्या ‘या’ प्रश्नांचं उत्तर कधी देणार? राऊतांचा सवाल

Subscribe

पुढील निवडणुकांसाठी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी महिनाभर देशव्यापी रॅल्या काढण्यात येणार आहेत. या रॅलीची सुरूवात आजपासून राजस्थान येथून होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रॅलीत सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्रातील सत्तेत (Central Government) नऊ वर्षे पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जनतेचे आभार मानले आहेत. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने पुढील निवडणुकांसाठी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी महिनाभर देशव्यापी रॅल्या काढण्यात येणार आहेत. या रॅलीची सुरूवात आजपासून राजस्थान येथून होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रॅलीत सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. (MP Sanjay Raut Slams PM Narendra Modi On 9 years Of BJP In Central Government)

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“सरकारला 9 वर्षे झाली, पहिली पाच वर्षे आणि आताची 4 वर्षे लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपाने सुरू केली. पण 9 वर्षांत जनतेला काय दिलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि जनतेला प्रश्न विचारू द्या. जसे राहूल गांधी परदेशात गेले असून तिथेही त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या देशातील प्रत्येक नेता हा पत्रकारांशी बोलतो. उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, शरद पवार, मल्लिकार्जून बोलत असतात. पण पंतप्रधान देशाच्या मनातील उत्तरे का देत नाहीत. पंतप्रधान मन की बात बोलत असतात, पण देशाच्या मन की बातबाबत आम्ही विचारलं तर, त्यावर ते बोलत नाहीत. स्वतशीच बोलत असतात. लोकांच्या मनात काय आहे? स्वतंत्रवृत्तीचा मीडिया प्रश्न विचारतो आणि त्याला आम्ही उत्तर दिलेली आहेत”, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : आता कोणत्या पक्षात जाणार? कीर्तिकरांना राऊतांचा सवाल

संजय राऊतांचे मोदी सरकारला प्रश्न

  • दहशतवाद कमी केला म्हणतात, मग मणिपूरमध्ये काय सुरू आहे?
  • अर्थव्यवस्था मजबूत आहे, दोन वेळा नोटबंदी करून का फसली?
  • डॉलरच्या तुलनेत रुपया 80रू. ते 82रु. इतका महाग का झालाय? का पडतोय रुपया?
  • देशाची अर्थव्यवस्था एकाच उद्योगपतीच्या हातात दिल्याने किती नुकसाना झालं?
  • LIC, Air India का विकावं लागलं? कोणासाठी विकत आहेत?

“अनेक गोष्टी लवकरच बाहेर येणार आहेत. तसेच आमची इच्छा आहे की, पंतप्रधानांनी जनतेच्या प्रश्नांना एकदा उत्तर द्यावीत”, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानातून जनसंपर्क मोहिमेला करणार सुरुवात; देशभरात 51 मोठ्या रॅली

महिनाभर देशव्यापी मोहिम

दरम्यान, मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असताना, पुढील निवडणुकांसाठी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी एक महिनाभर चालणाऱ्या देशव्यापी मोहिमेची सुरुवात बुधवारपासून होणार आहे. राजस्थानमधील अजमेर येथून या रॅलीला सुरूवात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. या मोहिमेअंतर्गत भाजपा सरकारचे नऊ वर्षांचे रिपोर्ट कार्डही जनतेसमोर ठेवणार आहे.

- Advertisment -