घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी नेत्यांच्या राजभवनावरील भेटी वाढल्या!

राष्ट्रवादी नेत्यांच्या राजभवनावरील भेटी वाढल्या!

Subscribe

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळताना आतापर्यंत राज्याकडून केंद्राकडे असणारा टीकेचा सूर ओसरल्याचे वातावरण गेल्या काही दिवसांपासून अनुभवायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला दिलेला मदतीचा ओघ पाहता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमाने कोविड परिस्थिती हाताळल्याबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे केलेले कौतुकाने महाविकास आघाडी खूश आहे. पण हे सगळे घडत असतानाच दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन खासदारांनी आठवड्याभरात राज्यपालांच्या घेतलेल्या सदिच्छा भेटींमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी २ मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठच आता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी १० मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. या दोन्ही भेटींचे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. राजकारणात दिसतं तसं नसतं आणि जे दिसत नाही त्या हालचाली जोरात सुरू असतात. राज्यपालांसोबत राष्ट्रवादीच्या खासदारांच्या भेटींमुळे नक्की महाविकास आघाडीत काय शिजतंय याच चर्चांना यानिमित्ताने पुन्हा एकदा उधाण आलं आहे असून या भेटी वादळापूर्वीच्या आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -