मोहित कंबोज हा भाजपाचा भोंगा आहे; राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांचा हल्लाबोल

मोहीत कंबोज हा फक्त भाजपाचा भोंगा आहे. त्याला दुसरे काही जमत नसून, तो फक्त एक आभास निर्माण करतोय, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. राज्यातील मागील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तरुंगात आहेत.

‘मोहीत कंबोज हा फक्त भाजपाचा भोंगा आहे. त्याला दुसरे काही जमत नसून, तो फक्त एक आभास निर्माण करतोय’, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. राज्यातील मागील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तरुंगात आहेत. त्यानंतर आता आणखी एक राष्ट्रवादीचा नेता लवकरच तरुंगात जाणार असल्याचे भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सांगितले आहे. कंबोज यांच्या या ट्विटनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (Monsoon Session) सुरु होणार आहे. या अधिवेशानापूर्वी अमोल मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. त्यावेळी मिटकरी यांनी कंबोज यांच्यावर टीका केली. “मोहीत कंबोज हा ब्रम्हज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का? याल कसे कळते ईडी आणि सीबीआय कुठे चौकशी करणार आहे? त्याच्यामुळे याचीच चौकशी झाली पाहिजे की, हा ईडीच्या कार्यालयात पूर्ण वेळ बसणारा कार्यकर्ता आहे का? मोहीत कंबोज हा फक्त भाजपाचा भोंगा आहे. त्याला दुसरे काही जमत नसून, तो फक्त एक आभास निर्माण करतोय. तसेच, पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर चर्चा भरकडवण्यासाठीचा हा त्याचा प्रयत्न आहे”, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.

हेही वाचा – भाजपाच्या मोहित कंबोजांच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचा बडा नेता; भ्रष्टाचार उघड करणार

भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या या ट्विटनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भाजपावर हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या त्या नेत्याबाबत ट्विट केले आहे. जवळपास पाच ट्विट आतापर्यंत मोहित कंबोज यांनी केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा हा नेता कोण, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यातील मागील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तरुंगात आहेत. त्यानंतर आता आणखी एक राष्ट्रवादीचा नेता लवकरच तरुंगात जाणार असल्याचे भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या या नेत्याचे नाव आणि त्याच्या घोटाळ्यांची माहिती देण्यासाठी मोहित कंबोज पत्रकार परिषद घेणार आहेत.


हेही वाचा – पुणे- अहमदनगर महामार्गावर कारचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार