घरमहाराष्ट्रकाँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्यामुळे अध्यक्ष बदलला- शरद पवार

काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्यामुळे अध्यक्ष बदलला- शरद पवार

Subscribe

नाना पटोले यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नाना पटोले यांनी राजीनामा देण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कांग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्यामुळे अध्यक्ष बदलाचा निर्णय घेतला, असं सांगितलं. शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी कांग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलताना आमच्याशी चर्चा केल्याचं देखील सांगितलं.

नाना पटोले यांनी आज विधानसभा उपाध्यक्ष नरीहर झीरवळ यांच्याकडे राजीनामा सोपवला. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राजीनामा देण्यावर शरद पवार यांनी कांग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्यामुळे अध्यक्ष बदलला, असं सांगितलं. कांग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलताना आमच्याशी चर्चा केली. त्यामुळे आता आता विधानसभा अध्यक्ष पदावर पुन्हा चर्चा होणार असून अध्यक्षपद तिन्ही पक्षाचं होतं ते आता खुलं झालं आहे, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – नाना पटोलेंनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा


विधानसभाध्यक्षपदी कोण?

नाना पटोले यांच्या राजीनाम्‍यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे. हे पद काँग्रेसकडेच राहिल्‍यास ज्‍येष्‍ठ नेते पृथ्‍वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, तसेच सुरेश वरपूडकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.मात्र राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदावर आता पुन्हा चर्चा होणार असल्याचे विधान केल्याने हा गुंता वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सत्ता समतोलासाठी काँग्रेसला हवं उपमुख्यमंत्रिपद

आघाडी सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे. त्यामुळे सत्ता समतोल साधण्यासाठी काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. काँग्रेसची ही मागणी मान्य झाल्यास विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबदल्यात शिवसेनेला काँग्रेससाठी एक मंत्रिपद द्यावं लागेल.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -