घरमहाराष्ट्रनील सोमय्यांना पहिला दणका

नील सोमय्यांना पहिला दणका

Subscribe

सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांनी मंगळवारी फेटाळून लावला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा दावा केला होता. नील सोमय्यांंनी पीएमसी बँकेचे पैसे आपल्या प्रकल्पात वापरले असून बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे असे म्हटले होते. यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

अनेक दिवसांपासून संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या असा संघर्ष सुरू आहे. ‘निकॉन इन्फ्रा’ च्या माध्यमातून अनेक ठिकाणी नील सोमय्या यांनी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, आम्ही कुठल्याही न्यायालयात जाणार नाही, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.

- Advertisement -

असे असूनही नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश दीपक भागवत यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. त्यांनी नील सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना पहिला दणका दिला आहे. त्यामुळे आता नील सोमय्यांना अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -