घरताज्या घडामोडीराज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट; सोमवारी 414 नवे रुग्ण

राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट; सोमवारी 414 नवे रुग्ण

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात सोमवारी 414 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 771 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात सोमवारी 414 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 771 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच, राज्यात आतापर्यंत 79 लाख 57 हजार 95 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98. 10 टक्के झाला आहे. (New 414 corona patients in maharashtra)

गेल्या काही दिवसांपासून नव्या रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रूग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. राज्यात गुरुवारी राज्यात 1076 कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर शुक्रवारी 955 रूग्णांची नोंद झाली होती. शनिवारी 734 नव्या रूग्णांची नोंद झाली होती. रविवारी राज्यात 701 नव्या रूग्णांची नोंद झाली होती. मात्र आज लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज राज्यात 414 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

मागील चार दिवसांतील ही आकडेवारी पाहाता गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रूग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे. रूग्णसंख्या कमी होत असली तरी अद्याप कोरोना संपूर्ण धोका टळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये देखील घट होत आहे. शुक्रवारी राज्यात सहा बाधितांचा मृत्यू झाला होता. तर रविवारी तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. तर आज केवळ एका बाधिताचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 82 टक्के एवढा आहे.

- Advertisement -

राज्यात सध्या 5 हजार 862 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. यात सर्वाधिक संख्या ही मुंबईतील असून, सध्या 1 हजार 666 सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईनंतर ठाण्यात 1 हजार 290 सक्रिय रूग्ण आहेत. त्या खालोखल पुण्यात सध्या 1 हजार 237 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत.

राज्यासह देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 5 हजार 221 दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा वाढून 4 कोटी 45 लाख 50 इतका झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 47 हजार 176 वर पोहोचली आहे.


हेही वाचा – मुंबईतील गोवंडीच्या शासकीय वसतिगृहातून 6 मुली बेपत्ता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -