Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुंबई, पालघर, नगर व अन्य दोन ठिकाणी बांधले जाणार नवीन कारागृह

मुंबई, पालघर, नगर व अन्य दोन ठिकाणी बांधले जाणार नवीन कारागृह

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

Related Story

- Advertisement -

राज्याच्या कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी मुंबई, गोंदिया, नगरमधील नारायणडोह, पालघर व हिंगोलीत नवीन कारागृह बांधण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातील मध्यवर्ती कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक की असल्याबाबत मोहन मते यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर गृहविभागाने सविस्तर उत्तर दिले आहे. राज्यातील ६० कारागृहातील कैद्यांची क्षमता २४ हजार ०३२ आहे. पण जानेवारी २०२१अखेर पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील कारागृहात ३२ हजार ९९६ कैदी आहेत. म्हणजे क्षमतेपेक्षा १३७ टक्के अधिक कैदी आहेत.

क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी

मुंबई, येरवडा, ठाणे, संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर व तळोजा या मध्यवर्ती कारागहातील कैदी ठेवण्याची क्षमता १४ हजार ४९१ आहे. ण जानेवारी २०२१पर्यंतच्या आकडेवारी नुसार या नऊ कारागृहातील कैद्यांची संख्या २३ हजार ७५७ कैदी आहे. म्हणजे क्षमतेपेक्षा १६५ टक्के अधिक कैदी आहे. महिला कारागृहात महिला कैदी ठेवण्याची क्षमता १ हजार २७५ आहे. पण जानेवारी २०२१च्या आकडेवारीनुसार १ हजार ४२१ महिला कैदी आहेत.

नवीन बॅरेक्स बांधण्याची योजना

- Advertisement -

येरवडा, पुणे व ठाणे या कारागृहातील उपलब्ध जागेवर दुसरे कारागृह बांधण्याचा प्रस्ताव आहे. जिल्हा व खुल्या कारागृहांमध्ये अतिरिक्त तसेच नवीन बॅरेक्स बांधण्याचे काम सुरु आहे अशी माहितीही लेखी उत्तरात देण्यात आली आहे.

 

- Advertisement -