घरठाणेउल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमधील कचरा व्यवस्थापन होणार अत्याधुनिक

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमधील कचरा व्यवस्थापन होणार अत्याधुनिक

Subscribe

Waste Management in Thane | येत्या वर्षभरात हा प्रकल्प उभारून, कार्यन्वित करण्यासाठीची निविदा काढण्यात आली आहे. यामुळे या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकणार आहे.

Waste Management in Thane | ठाणे – राज्यातील पहिल्या अत्याधुनिक एकात्मिक घनकचरा प्रकल्पाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने निविदा जाहीर केली आहे. अंबरनाथ, बदलापूर आणि आणि उल्हासनगरसाठी हा प्रकल्प प्रस्तावित असून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. येत्या वर्षभरात हा प्रकल्प उभारून, कार्यन्वित करण्यासाठीची निविदा काढण्यात आली आहे. यामुळे या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकणार आहे.

ठाणेपल्याड असलेल्या अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या शहरांमध्ये नव्याने मोठ्या संख्येने उभी राहणारी गृहसंकुले, नव्याने येणारे उद्योग यामुळे शहरीकरण अगदी झपट्याने होत आहे. या वाढत्या शहरीकरणामुळे ओघाने शहरातील कचरा व्यवस्थापनाची समस्याही मोठी झाली होती. या तीनही शहरांतील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी हा प्रकल्प राबवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. या प्रकल्पाची व्यापक उपयुक्तता पाहता राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी देण्यात आली. यासाठी शासनाकडून १४८ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाला आता गती मिळाली असून हा प्रकल्प कार्यन्वित करण्यासाठी एमएमआरडीएकडून नुकतीच निविदा जाहीर करण्यात आली आहे. एकात्मिक घनकचरा प्रक्रियेच्या सुविधेचा विकास आणि संचलनासाठी, संरचना – बांधणे – चालविणे – हस्तांतरित करणे (DBOT) या तत्वावर हा प्रकल्प चालविण्यात येणार आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निविदेनुसार नऊ महिन्यात याचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून पुढील पंधरा वर्षांपर्यंत देखभाल करण्यासाठी ही निविदा काढण्यात आली आहे. प्रकल्पाची उपयुक्तता पाहता मुंबई आयआयटीने प्रकल्पाचे कौतुक केले असून तसे प्रमाणपत्र मिळाले आहे. यातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रकल्प घनकचरा व्यवस्थापनाच्या कामी उभारला जातो आहे.

- Advertisement -

कुठे होईल हा प्रकल्प

बदलापूरच्या वालिवली येथील सर्वे क्रमांक १८८ येथील २३ एकर जागेपैकी १३ एकर जागेत ६०० मेट्रीक टन क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारला जाणार आहे. हा प्रकल्प बंदिस्त असणार आहे. येथे कोणत्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नसून संकलित केलेला कचरा थेट यंत्रांमध्ये प्रक्रियेसाठी टाकण्यात येणार आहे. यामुळे आसपासच्या नागरिकांना या प्रकल्पाचा कोणताही त्रास होणार नाही आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात अशा पद्धतीचा अत्याधुनिक कचरा प्रकल्प उभा राहावा यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे सातत्याने आग्रही होते.

- Advertisement -

प्रकल्प कसा असेल

या प्रकल्पांतर्गत सर्व प्रकारच्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार असून यातील ४५ टक्के ओल्या कचऱ्याचे कम्पोस्ट खतामध्ये रूपांतर करून त्याची विक्री देखील केली जाणार आहे. तर उर्वरित ५५ टक्के कचऱ्यापैकी २२ टक्के राडारोडा, डेब्रीज आहे. त्याचा वापर उपलब्ध जागेत असलेल्या खाणीत भूभराव करण्यासाठी वापरला जाईल. तर १३ टक्के एमआरएफ प्रकारातील प्लास्टीक, काचा आणि कापड यासारख्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. उरलेल्या २० टक्के आरडीएफ प्रकारातील कचऱ्याचे कांदा कोळसा या जास्त उष्मांक असलेल्या कोळशात रूपांतर केले जाणार आहे.

अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात उभा राहणारा हा एकात्मिक अत्याधुनिक घनकचरा महाराष्ट्रासाठी पायलट प्रकल्प ठरणार आहे. कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी दोन नगरपालिका आणि एक महापालिकेचा हा पहिलाच क्लस्टर प्रकल्प आहे. ज्या नगरपालिकांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही अशा छोट्या नगरपालिकांसाठी हा महत्वाचा प्रकल्प आहे. राज्य सरकारच्या मदतीने हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होईल. तसेच हा प्रकल्प कचरा समस्येवर दिशादर्शक ठरेल, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -