घरक्राइममाझा नंबर ब्लॉक का केला...; हा मेसेज निखिल शेंडेंच्या अंगलट?

माझा नंबर ब्लॉक का केला…; हा मेसेज निखिल शेंडेंच्या अंगलट?

Subscribe

 

पुणेः माझा नंबर ब्लॉक का केला, असा मेसेज हवाई दलातील हवालदार निखिल शेंडेंने DRDO चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना केला होता. या मेसेजमुळेच निखिलची एटीएसने चौकशी केली आहे. निखिल निर्दोष आहे, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

- Advertisement -

शेंड्ये मुळचा नागपूरचा आहे. तो धावपटू आहे. त्यांची आई आणि काका शांतीनगर परिसरात राहतात. निखिलबाबतचे वृत्त ऐकून धक्का बसला. तो निर्दोष आहे. चौकशी करुन त्याची सुटका करण्यात आली आहे. खेळाडू म्हणूनच त्याला हवाई दलात नोकरी मिळाली आहे. घर आणि मैदान एवढंच त्याच जग आहे. याप्रकरणात जाणीवपूर्वक त्याला अडकवण्यात आलं आहे, असा दावा शेंड्येच्या आईने केला आहे.

तपासात निखिलचा मोबाईल क्रमांक कसा आला याचा शोध घेतला जात आहे. पुण्यात त्याची चौकशी झाली. त्यात पोलिसांच्या हाती काही लागले नाही. म्हणून त्याला सोडून देण्यात आले आहे. तो निर्दोष असून सध्या बंगळुरू येथे कर्तव्यावर आहे, असे काकांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

DRDO या संस्थेत काम करणारे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर यांच्यासोबत हवाई दलाचे IAF अधिकारी निखिल शेंडे हेही पाकिस्तानच्या जाळ्यात अडकल्याची माहिती दहतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुणे विशेष न्यायालयात दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. डॉ. कुरुलकर यांना पाकिस्तानातून ज्या IP address वरुन संपर्क केला जात होता. त्याच IP address द्वारे शेंडे यांच्याशी संपर्क केला जात होता. डॉ. कुरुलकर यांच्याप्रमाणेच शेंडे यांना पाकिस्तानने आपल्या जाळ्यात अडकवले होते. शेंडे यांच्याही सोशल मीडियाचा वापर केला जात होता, अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली. शेंड्ये यांची हवाई दलही चौकशी करणार आहे, असेही बोलले जात होते. मात्र शेड्येची चौकशी करुन त्याला सोडण्यात आले असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत एटीएसने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -