घरमहाराष्ट्रVande Bharat Train : हे काय बोलून गेले निलेश राणे?? भाजपला घरचा...

Vande Bharat Train : हे काय बोलून गेले निलेश राणे?? भाजपला घरचा आहेर

Subscribe

कणकवली स्थानकाप्रमाणेच या वंदे भारत ट्रेनला कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. पण या ट्रेनला कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा का देण्यात येणार नाही, याबाबत निलेश राणे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पण हे स्पष्टीकरण देत असतानाच त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

बुधवारी (ता. 31 मे) केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची काल महत्त्वपूर्ण भेट झाली. या भेटीमध्ये अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनला कणकवलीत थांबा देण्याची मान्यता दिली आहे. यामुळे कोकणवासीयांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. वंदे भारत ट्रेनला कणकवली रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, यासाठी आमदार नितेश राणे प्रयत्न करत होते. यासाठी त्यांच्याकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आले असून या गाडीला कणकवलीत थांबा देण्यात येणार आहे. पण यामुळे काही लोक मात्र नाराज झाले आहेत. याबाबतचे ट्वीट निलेश राणे यांच्याकडून करण्यात आले आहे. पण हे ट्वीट करताना त्यांनी मात्र पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

हेही वाचा – आनंदाची बातमी! कोकणवासीयांची गणपतीवारी सुखकर; वंदे भारतला कणकवलीत थांबा

- Advertisement -

कणकवली स्थानकाप्रमाणेच या वंदे भारत ट्रेनला कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. पण या ट्रेनला कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा का देण्यात येणार नाही, याबाबत निलेश राणे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पण हे स्पष्टीकरण देत असतानाच त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. “मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशन चं कसलंही अपग्रेडेशन चं काम झालं नसल्यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकाला वंदे भारत ट्रेन स्टॉप मिळाला नाही,” असे ट्वीट त्यांनी केले आहे. त्यामुळे मागची 9 वर्षे भाजपची सत्ता असताना कुडाळ रेल्वे स्थानकाकडे नेमके कोणत्या कारणामुळे दुर्लक्ष करण्यात आले आहे? असा प्रश्न आता या प्रकरणी उपस्थित करण्यात येत आहे.

“माझे काही सहकारी वंदे भारत ट्रेन जी ३ जून पासून कोकणात धावणार आहे त्या ट्रेनला कुडाळ स्टेशनसाठी थांबा मिळाला नाही याबद्दल निराश झाले पण आपल्याला मी सांगू इच्छितो मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचं अपग्रेडेशन झालेलं नाही. भारतीय रेल्वे जेव्हा एका महत्त्वाच्या रूट वर ट्रेन सुरू करते तेव्हा स्टेशनचा ग्रेड तपासते. मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशन चं कसलंही अपग्रेडेशन चं काम झालं नसल्यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकाला वंदे भारत ट्रेन स्टॉप मिळाला नाही आणि मागच्या पंचवीस वर्षांपासून कणकवली रेल्वे स्टेशन हेच जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणून बघितले जाते.” असे ट्वीट निलेश राणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

त्यामुळे त्यांच्या या ट्वीटला नेटकऱ्यांकडून उत्तर देण्यात येत आहे. “मागच्या 9 वर्षापासून सत्ता कुणाची आहे? कोण करणार मग ते काम? आपल्या कुटुंबात आमदार, केंद्रीय मंत्री असून देखील हे झाले नाही? कमाल आहे.” असे एक नेटकऱ्याकडून विचारण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजपची सत्ता असून देखील कुडाळ रेल्वे स्थानकांत कोणतेही अपग्रेडेशन का करण्यात आले नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

शनिवारी (ता. 3 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मडगाव-मुंबई, सीएसएमटी मार्गावर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. तर 5 जूनपासून ही वंदे भारत एक्स्प्रेस नियमितपणे मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन सकाळी 5.35 वाजता सुटेल आणि गोव्यातील मडगावला दुपारी 1.25 वाजता पोहोचेल. ही ट्रेन सकाळी ठाण्यात सकाळी 6.05 वाजता, पनवेल येथे 6.40 वाजता, खेड येथे 8.40 वाजता, रत्नागिरी स्थानकावर 10.00 वाजता आणि कणकवली येथे ही गाडी 11.20 वाजता पोहोचेल, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर मडगावमध्ये दुपारी 1.25 मिनिटांनी ही गाडी पोहोचेल. मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 2.35 वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ 5.35वाजताची असेल. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री 10.35 वाजता पोहोचेल.

तसेच परतीच्या मार्गावर मडगाव येथून सुटल्यावर मुंबईकडे जाताना कणकवली येथे 4.10 मिनिटांनी पोहोचेल. तसेच रायगड जिल्ह्यात रोहा आणि पनवेल येथे थांबा देण्यात आला आहे. मडगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना रोहा येथे रात्री 8.05 वाजता तर पनवेल येथे 9.18 वाजता आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री 10.35 वाजता पोहोचेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -