घरमहाराष्ट्रसंतोष परब यांच्यावरील हल्ला, राणेपुत्र नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून नऊ तास...

संतोष परब यांच्यावरील हल्ला, राणेपुत्र नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून नऊ तास चौकशी

Subscribe

कणवलीतील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणेंची अखेर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. या हल्ला प्रकरणात चौकशीला उपस्थित राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी २१ तारखेला नितेश यांना नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस येताच मला टार्गेट केले जात आहे, असा आरोप नितेश यांनी केला होता.

या हल्ला प्रकरणाच्या चौकशीसाठी नितेश कणकवली पोलीस ठाण्यात पोहचले होते. यावेळी तब्बल पाऊण तास ही चौकशी चालली. पोलीस निरीक्षकांच्या दालनात ही चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक हे पोलीस अधिकारी चौकशीवेळी उपस्थित होते. चौकशीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे नितेश राणे यांनी चौकशीआधी बोलताना सांगितले. जी माहिती पोलिसांना हवी होती ती दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

कणकवलीत संतोष परब या शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्यात पुणे येथील एका नेत्याच्या मॉलचा कर्मचारी होता, योग्यवेळी त्या नेत्याचे नाव जाहीर करणार, पोलिसांनी पडताळणी करावी, असे सेनेचे स्थानिक खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. खा. राऊतांचा रोख नितेश राणेंकडे असल्याचे बोलले जाते.

हा संस्कृतीचा प्रश्न
दरम्यान, विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून मांजराचा आवाज काढणार्‍या नितेश राणे यांच्यावर सर्वच क्षेत्रातून टीका होऊ लागल्यावर भाजपनेही आता घडल्या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नितेश राणे हा सिंधुदुर्गचा अपमान आहे. कोकणची संस्कृती अशी नाही. नितेश राणेंचा तो बालिशपणा होता. कोकणाने आदर्श परंपरा निर्माण केली आणि जपलीही आहे. म्याव म्याव करणार्‍यांना याचे भान राहिले नसल्याची टीका राऊत यांनी केली. आपण किती पोरकट आणि बालीश आहोत याचे हे द्योतक असल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. असल्या वागण्याने सिंधुदुर्गवासीयांची मान शरमेने खाली गेली असल्याचे राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -