घरताज्या घडामोडीविरोधकांमध्येही ताळमेळाचा अभाव? पत्रकार परिषदेत दरेकरांना बोलण्याची संधी नाही

विरोधकांमध्येही ताळमेळाचा अभाव? पत्रकार परिषदेत दरेकरांना बोलण्याची संधी नाही

Subscribe

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांच्यावतीने पत्रकार परिषदेला फक्त विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विरोधी पक्षाची भूमिका मांडली. मात्र या पत्रकार परिषदेला उपस्थित असेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर मात्र गप्प होते. तसेच या पत्रकार परिषदेला रासपचे महादेव जाणकर आणि आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. तर रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत उशीरा पोहोचले. त्यामुळे विरोधकांमध्ये तालमेळ नाही की काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

“सरकारला अजूनही सूर गवसलेला नाही तसेच त्यांची दिशाही ठरलेली नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजूनही ताळमेळ नाही. त्यामुळे या चहापानाच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांनी आपापसात ताळमेळ साधावा”, अशी टीका फडणवीस यांनी आज सरकारवर केली होती. मात्र त्याच पत्रकार परिषदेत विरोधकांमध्येही ताळमेळ नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजप सत्तेत असताना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर विरोधकांतर्फे संयुक्त पत्रकार परिषद घेतली जात असे. त्यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्यांदा पत्रकार परिषदेला संबोधित करायचे आणि त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बोलायचे. कधी कधी इतर पक्षातील नेतेही भूमिका मांडत असत. मात्र भाजप विरोधत असताना ‘सब कुछ देवेंद्र फडणवीस’, असे चित्र पाहायला मिळाले.

- Advertisement -
हे वाचा – आधी आपआपसात ताळमेळ बनवा, मगच चहापानाला बोलवा – फडणवीस

सावरकरांचा अपमान करणारी काँग्रेस शिवसेनेला चालते का?

दरम्यान काँग्रेसचे पाक्षिक शिदोरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्यात आला. यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी ताशेरे ओढत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारी काँग्रेस शिवसेनेला चालते का? असा सवाल उपस्थित केला. तसेच २६ तारखेला सावरकरांचा गौरव विधिमंडळात झाला पाहिजे, ही आमची मागणी असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एवढेच नाही तर प्रभू रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, याचे पुरावे काँग्रेस मागत आहे. तर दुसरीकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे शिवसेना मागत आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकार एकप्रकारे सारखेच असल्याचे म्हणत फडणवीस यांनी शिवसेना आणि काँग्रेवर टीका केली. दरम्यान फडणवीस यांनी वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेत वारीस पठाण यांच्या वादग्रस्त विधानाने हिंदू समाजाला अपमानित करण्याचा प्रकार कोणी करू नये. यावर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही दिला.

या मुद्यावर मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

दरम्यान विविध मुद्यावर शिवसेना आणि ठाकरे सरकारला पत्रकार परिषदेत घेरणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी एल्गार परिषद, सीएए, एनपीआर आणि एनआयएच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन मानले. एल्गार परिषदेचा तपास NIA ला दिल्याबद्दल तसेच CAA आणि NPR ला पाठिंबा दिल्याबद्दल आपण मुख्यमंत्र्याचे आभार मानत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जनगणना NPR हा केंद्राचा कायदा आहे, या कायद्यात कोणी हलगर्जीपणा करू शकत नाही. तसेच CAA मध्ये नागरिकता भेटणार आहे, ती जाणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -