घरताज्या घडामोडीआधी आपआपसात ताळमेळ बनवा, मगच चहापानाला बोलवा - फडणवीस

आधी आपआपसात ताळमेळ बनवा, मगच चहापानाला बोलवा – फडणवीस

Subscribe

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत असून, विरोधक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आक्रमक दिसत आहेत. आक्रमक असलेल्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घातला. “या सरकारने अगोदर आपापसात चहापान करून ताळमेळ बनवावा आणि नंतरच आम्हाला चहापानाला बोलवावे”, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मात्र या सरकारला अजूनही सूर गवसलेला नाही, तसेच त्यांची दिशाही ठरलेली नाही. त्यामुळे हे सरकार गोंधळलेल्या परिस्थितीत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हे वाचा – मराठा आंदोलकांची तब्येत खालावली…

शेतकरी कर्जमाफीवरून या सरकारने घुमजाव केले असून, आम्ही ज्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अटी लावल्या होत्या त्यापेक्षा जाचक अटी या सरकारने लावल्याची टीका देखील फडणवीस यांनी यावेळी केली. एवढेच नाही तर सातारा, सांगली, कोल्हापूर येथील शेतकऱ्यांना आम्ही जी कर्जमाफी दिली त्या व्यतिरिक्त हे सरकार काहीही देणार नसल्याचे सांगत आम्ही अधिवेशनात शेतकऱ्यांबद्दल आवाज उठवणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. दरम्यान महिला अत्याचाराबाबत देखील हे सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत पोलिसांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याची टीकी देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

- Advertisement -

दरम्यान फडणवीस सरकारच्या काळात ज्या योजना सुरु करण्यात आल्या त्या योजनांना स्थगिती देण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप करत मराठवाडा वॉटर ग्रीड प्रश्न, ग्राम सडक योजनेला दिलेली स्थगिती, जलयुक्त शिवार योजनेला दिलेली स्थगिती यावर आम्ही सभागृहात आवाज उठवणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. दरम्यान फडणवीस सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार तसेच वृक्ष लागवड योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधक करत असून, ठाकरे सरकार याची चौकशी करणार अशी चर्चा सुरु असतानाच “आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार असून, वृक्ष लागवडीत आणि जलयुक्त शिवारात ही महत्वाची कामे झाल्याचे सांगत खुशाल चौकशी करा”, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच जर राज्य सरकारला श्वेतपत्रिका काढायची असेल तर खुशाला काढावी, असे सांगतानाच १९९९ पासून २०१५ पर्यंत अर्थपूर्ण श्वेतपत्रिका काढावी ही आमची मागणी असून, प्रत्येक ५ वर्षांनी श्वेत पत्रिका काढण्यात यावी, असे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Interaction with media as the Budget Session of Maharashtra Legislature begins tomorrow #BudgetSession

Devendra Fadnavis ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 22, 2020

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -