घरमहाराष्ट्रराणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, 29 एप्रिलपर्यंत राणा दाम्पत्य कारागृहातच

राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, 29 एप्रिलपर्यंत राणा दाम्पत्य कारागृहातच

Subscribe

राणा दाम्पत्याच्या याचिकेवर आज सुनावणी झाली असता सत्र न्यायालयानं राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. 29 तारखेपर्यंत राणा दाम्पत्य हे कारागृहातच राहणार आहेत.

मुंबईः मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असता राणा दाम्पत्यानं याविरोधात सत्र न्यायालयात दाद मागितलीय.

राणा दाम्पत्याच्या याचिकेवर आज सुनावणी झाली असता सत्र न्यायालयानं राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. 29 तारखेपर्यंत राणा दाम्पत्य हे कारागृहातच राहणार आहेत. त्यांना सत्र न्यायालयाकडूनही कोणताही दिलासा मिळालेला नाही.

- Advertisement -

दंडाधिकारी न्यायालयात त्यांची जामीन याचिका प्रलंबित आहे. लीगल प्रोसिडिंग न करता राणा दाम्पत्य सत्र न्यायालयात अर्ज केल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे. 29 एप्रिलला या प्रकरणात पुढील सुनावणी होणार आहे. उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला तीन दिवसांचा अवधी देण्यात आला असून, ठाकरे सरकारला सत्र न्यायालयानं अर्जासंबंधी उत्तर देण्यास सांगितलं आहे.

दुसरीकडे नवनीत राणा यांनी खार पोलिसांवर अनुसूचित जातीची असल्याने भेदभाव करणारी वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. २३ तारखेला रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये पाणीही देण्यात आले नाही, असंही नवनीत राणा म्हणाल्यात. कोठडीतल्या वागणुकीबाबत नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं असता या प्रकरणाबाबत २४ तासांत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश लोकसभा सचिवालयाने दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या रिपोर्ट आधारे नोट द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

नवनीत राणांना उच्च रक्तदाबाचा त्रास

खासदार नवनीत राणा यांची जेलमध्ये तब्येत खालावली आहे. नवनीत राणांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला आहे. त्यांच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. रवी राणांचीसुद्धा तब्येत बिघडली असल्याची माहिती मिळाली आहे.

राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशी कोणतीही कृती, वक्तव्य करू नका, अशी नोटीस मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याला देण्यात आली होती, मात्र त्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्री तसेच राज्य सरकारविरोधात द्वेषाची भावना निर्माण होईल, असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात 124 अ या कलमांतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचाः तुरुंगात पाणी मागितल्यामुळे जातीवाचक शिवीगाळ, नवनीत राणांचे पत्राद्वारे गंभीर आरोप

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -