घरमहाराष्ट्रनाशिकनिवडणूकीचे फटाके दिवाळी नंतरच

निवडणूकीचे फटाके दिवाळी नंतरच

Subscribe

न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले तरी पावसाळ्यापूर्वी निवडणुका घेणे शक्य नाही

नाशिक : महापालिका निवडणुकांसदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकांवर सोमवारीही (दि. २५) पुन्हा सुनावणी टळली असून, आता पुढील सुनावणी ४ मेस होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. या दिवशी सुनावणी झाली आणि राज्य शासनाच्या बाजूने निकाल लागला तरी आता निवडणुका पावसाळ्यानंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची मुदत संपल्याने त्याच्या आतच निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना, नंतर ओबीसी आरक्षणामुळे गोंधळ निर्माण झाला. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्य शासन आणि राजकीय पक्ष निवडणुका घेण्यास तयार नाहीत, त्यातच राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून काढून आपल्या ताब्यात घेण्याचे ठरविल्याने आता वेगवेगळ्या विषयांवरून सात याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्याची सुनावणी दोन वेळा टळली. सोमवारी (दि. २५) फैसला होईलच अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच होऊ शकलेली नाही.

- Advertisement -

आता पुढील तारीख ४ मे देण्यात आली आहे. या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले तरी अंतिम प्रभागरचना किंवा नव्याने प्रभागरचना होणे तसेच आचारसंहिता हा सर्व कालावधी बघितला तर पावसाळ्यापूर्वी निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे आता दिवाळीनंतरच निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -