घरताज्या घडामोडीकाही झालं तरी या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढायचं - अजित पवार

काही झालं तरी या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढायचं – अजित पवार

Subscribe

केंद्र सरकार लॉकडाऊनमध्ये बऱ्याच अटी शिथिल करण्याचा प्रयत्न करत आहे. कुणीही अन्न-पाणीविना राहणार नाही याची राज्याकडून खबदारी घेतली जात आहे. अजूनही धान्य देण्याची तयारी आहे. काही ठिकाणी आपणं रॉकेल देखील देत आहोत. काही झालं तरी या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढायचं आहे. पण संकटातून बाहेर काढताना अन्न मिळालं नाही म्हणून काहीतरी वेगळं अघटीत घडतंय अशी वेळ राज्यावर येऊन द्याची नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.

साताऱ्यात कोविड-१९ सेंटर सुरू होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेत असताना कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, अशा प्रकाराची खबरदारी मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण घेत आहोत. तसंच साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ची चाचणी सेंटर सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आरोग्य सचिवांना सोमवार-मंगळवार पासून साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ चाचणी सेंटर सुरू करण्याची कारवाई दिली आहे, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

तसंच साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा जागेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे अजित पवारांनी सांगितलं आहे. कृष्णा खोरे विकास महामंडाळाची ६९ एकर जागा घेणार आहे. शिवाय लवकरच रखडलेल्या मर्ढेकर स्मारक पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.

अजित पवार यांनी पुढे सांगितलं, राज्य सरकारनं बोगस बियाणं कंपन्यांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. बियाणं उगवलं नाही तर त्या बियाणं कंपन्यांवर कारवाई होणार आहे. पीडित शेतकऱ्यांना तातडीनं नवं बियाणं देण्याचे आदेश कंपन्यांना देण्यात आले आहेत. तसंच शेतकऱ्यांना बियाणं कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी, असं सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कारखाने चालू न होणे हे देशातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक – शरद पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -