घरमहाराष्ट्रकोरोना नियंत्रणासाठी 'केडीएमसी'ची प्रतिबंधित क्षेत्र कोरोना कमिटी गठित

कोरोना नियंत्रणासाठी ‘केडीएमसी’ची प्रतिबंधित क्षेत्र कोरोना कमिटी गठित

Subscribe

पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाबाधित रूग्‍णांची वाढती रूग्‍ण संख्‍या पाहता, कोरोना विषाणूचा जास्‍त प्रार्दुभाव असलेला भाग हा प्रतिबंधित क्षेत्र म्‍हणून घोषित करण्‍यात आला आहे. या भागामध्‍ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्‍हणून याकरीता अनेक उपाययोजना हाती घेवून त्‍याची अंमलबजावणी करण्यासाठी स्‍थानिक लोकप्रतिनिधी, राजकिय पदाधिकाऱ्यांचे पदाधिकारी, स्‍वयंसेवी संस्‍था व नागरिकांचे सहकार्य मिळणेकामी ‘प्रतिबंधित क्षेत्र कोरोना कमिटी’ गठित करण्‍यात येत आहे. या समितीने त्‍यांचे कार्यक्षेत्रातील कोरोना रोगाच्‍या नियंत्रणासाठी खालील बाबींवर प्राधान्‍याने कार्यवाही करावी, असे निर्देश कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

यामध्‍ये महापालिका सदस्‍य/सदस्‍या (संबंधित प्रभागातील जेष्‍ठ सदस्‍य) हे अध्‍यक्ष राहणार असून, प्रतिबंधित क्षेत्रातील संबंधित महापालिका सदस्‍य/सदस्‍या, संबंधित पोलिस स्‍टेशनचे अधिकारी, संबंधित नागरी आरोग्‍य केंद्राचे वैदयकिय अधिकारी, संबंधित क्षेत्रातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्‍वयंसेवी संस्‍थांचे पदाधिकारी, खाजगी वैदयकिय व्‍यावसायिक, किराणा दुकानदारांचे प्रतिनिधी, मेडिकल दुकानदारांचे प्रतिनिधी, भाजीपाला दुकानदारांचे प्रतिनिधी हे सदस्‍य तसेच संबंधित प्रभागक्षेत्र अधिकारी हे सदस्‍य सचिव असणार आहेत.

- Advertisement -

काय आहेत समितीची कामे

१. वैदयकिय व्‍यवसायिक यांची यादी तयार करणे, त्‍यांच्याकडील ओपीडी मध्‍ये तापाच्या रूग्‍णांची माहिती दररोज मिळेल यासाठी कार्यवाही करणे, तापाच्‍या रूग्‍णांबाबत पुढील उपचार व आवश्‍यकतेनुसार कोविड चाचणी करून त्‍यांचे विलगीकरण करणे बाबत कार्यवाही करणे.
२. पॉझिटिव रूग्‍णांचे हायरिस्‍क व लो रिस्‍क संपर्क शोधणे व विलगीकरण कक्षात पाठविणे व होम विलगीकरण केले असल्‍यास त्‍यांचेवर लक्ष ठेवणे.
३. होम क्‍वारंटाईन करणे शक्‍य नसल्‍यास अशा व्‍यक्‍तींना कोणत्‍याही परिस्थितीत संस्‍थात्‍मक विलगीकरण कक्षात पाठविणे.
४. सदर भागांमध्‍ये अत्‍यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्‍तु विक्रिंच्‍या दुकाने व्‍यतिरिक्‍त अन्‍य सर्व आस्‍थापने बंद असल्‍याची खाञी करून त्‍यासाठी उपाययोजना राबविणे.
५. प्रतिबंध भागामध्‍ये नागरिकांचा अनावश्‍यक वावर थांबविणे व जीवनावश्‍यक वस्‍तू घरपोच पुरवठा करण्‍यासाठी स्‍वयंसेवक नेमणे.
६. प्रतिबंधित क्षेञाच्‍या सीमा सील करून अनुज्ञेय वाहतूक वगळता अन्‍य वाहतूक १०० टक्‍के बंद करून नागरिकांना देखील ये-जा करण्‍यास प्रतिबंध करणेकामी पोलिस यंत्रणेस व प्रशासनाचे मदतीसाठी स्‍वयंसेवक उपलबध करून देणे.
७. प्रतिबंधित क्षेत्रामध्‍ये सील करण्‍यात आलेल्‍या इमारतीतील रहिवाश्‍यांचे विलगीकरण योग्‍य पध्‍दतीने असल्‍याबाबत देखरेख ठेवणे व आढावा घेणे.
८. होम क्‍वारंटाईन केलेल्‍या पॉझिटिव्‍ह रूग्‍णांच्‍या विलगीकरणाबाबत नियंत्रण ठेवणे.
९. प्रतिबंधित क्षेत्रतील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करून स्‍वयंसेवक उपलबध करून यंत्रणेस सहकार्य करणे.
सदर समितीद्वारे होणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेण्‍यासाठी तसेच नियंत्रण ठेवणेसाठी कार्यकारी अभियंता व उपअभियंता पदावरील अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून, या सनियंत्रण अधिकाऱ्यांनी कमिटी कडून सुचविण्‍यात आलेल्‍या उपायोजनांसाठी आवश्‍यक ते सहकार्य व समन्‍वय करावयाचे आहे.


हेही वाचा – मंत्रालयात जर बैठका होतात तर पालिकेत झुमअॅपद्वारे बैठका का?; रईस शेख यांचा सवाल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -