Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र महावितरणाचा ग्राहकांना पुन्हा झटका! उद्यापासून सुरु होणार बिलांची वसुली

महावितरणाचा ग्राहकांना पुन्हा झटका! उद्यापासून सुरु होणार बिलांची वसुली

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे जाहीर केलेल्या पहिल्या लॉकडाऊन वेळी महावितरणाने वीज बिल माफीचे आश्वासन दिल्याने राज्यातील लाखो ग्राहकांनी अव्वाचा सब्बा वीज बिले भरली नव्हती. परंतु अनलॉकची घोषणा होताच महावितरणाने वाढीव वीज बिले वसुल करण्यास सुरुवात केली. यात पुन्हा दुसऱ्या अनलॉकचा निर्णय जाहीर झाल्यानंतर महावितरणाने ग्राहकांना पुन्हा एक मोठा झटका दिला आहे. त्यामुळे उद्यापासून राज्यात थकीत वीज बिलांची वसुली महावितरणाकडून केली जाणार आहे. असे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लॉकडाऊनदरम्यान राज्यातील अनेक उद्योग धंदे, दुकाने, व्यापार पूर्णत: बंद होते. तर लाखो लोकांचे रोजगार गेले. याचदरम्यान महावितरणाने अव्वाचा सव्वा बिले पाठवत लोकांना आणखीचं आर्थिक संकटात टाकले. हाताला काम नसल्याने हे वीज बिल भरायचे कसा अशा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला. या प्रश्नावरून राज्यात राजकीय वातावरण बरेच तापले होते. मात्र लॉकडाऊन संपताच महावितरणाने लोकांकडून बिलांची वसुली करण्यास पून्हा सुरुवात केली. कधी मीटर बंद तर कधी डीपी बंद करून लोकांकडून बिलं वसूल करण्यात आली.

- Advertisement -

आता दुसरं अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाल्याने महावितरणाकडून उद्यापासून थकित बिलं वसूल करण्यास सुरुवात होणार आहे. असे आदेशही महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.मात्र लॉकडाऊन उठले असले तरी नागरिकांनवरील आर्थिक बोजा कमी झालेला नाही, अशा संकटात महावितरण बिलांसाठी मागे लागल्यामुळे नागरिकांना नवा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.


Surya Grahan 10 June 2021: आज २०२१ वर्षातील पहिले सूर्यग्रहण, पाहा, अद्भूत योग


 

- Advertisement -