घरटेक-वेकखुशखबर! Renault च्या 'या' कारवर मिळतेय ७५ हजारांची सूट

खुशखबर! Renault च्या ‘या’ कारवर मिळतेय ७५ हजारांची सूट

Subscribe

रेनो इंडिया जूनमध्ये आपल्या गाड्यांवर भारी सवलत देत आहे. ही सवलत कंपनीच्या जवळजवळ सर्व लोकप्रिय मॉडेल्सवर उपलब्ध आहे. यात क्विड, किगर, ट्रायबर आणि डस्टर या सर्व कारचा समावेश आहे. जूनमध्ये खरेदीवर ग्राहक ७५,००० रुपयांपर्यंत बचत करू शकतात. रेनो क्विड कंपनीच्या सर्वाधिक विक्री करणार्‍या मोटारींपैकी एक आहे. या ५ सीटर कारची एक्स-शोरूम किंमत ३.३२ लाख रुपये पासून सुरू होते. कंपनीने आपल्या २०२० मॉडेल आणि २०२१ या दोन्ही मॉडेलवर वेगवेगळ्या ऑफर्स सादर केल्या आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना ५२,००० रुपयांपर्यंत जास्तीत जास्त लाभ मिळू शकेल.

रेनो क्विडच्या २०२० मॉडेलच्या खरेदीवर कंपनी २०,००० रुपयांपर्यंतची रोख सवलत देत आहे. त्याचबरोबर २०२१ मॉडेलवर ही सवलत १०,००० रुपये आहे. या व्यतिरिक्त कंपनी १०,००० रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस, १०,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत आणि ५,००० रुपयांपर्यंत रुरल सूट देखील देत आहे. यासह तुम्ही जर कंपनीच्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवरून थेट बुकिंग केले तर तुम्हाला दोन हजार रुपयांची जास्तीची रोकड सूट मिळेल. अशा प्रकारे, क्विडवर एकूण जास्तीत जास्त सूट ५२,००० पर्यंत आहे.

- Advertisement -

रेनो क्विडचे बेसिक स्टँडर्ड किंवा आरएक्सई व्हेरिएंट खरेदी करणार्‍या ग्राहकांना ऑनलाईन बुकिंगवर सूट मिळणार नाही. दुसरीकडे कंपनीच्या RXE 0.8 लिटर व्हेरिएंटवर फक्त १०००० रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस आणि ग्राहक केवळ कॉर्पोरेट सवलत किंवा ग्रामीण सूट मिळवू शकतात. Kwid च्या ड्युअल-टोन नॅनोटेक व्हेरियंटवर कोणतीही सूट उपलब्ध नाही.

देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार रेनो ट्रायबरच्या २०२० मॉडेलवर ग्राहकांना २५,००० रुपयांपर्यंतची रोख सवलत मिळू शकते. २०२१ मॉडेलसाठी हे १०,००० रुपये आहे. ऑनलाईन बुकिंगवर ग्राहकांना ५,००० रुपयांची अतिरिक्त रोख सवलत मिळेल. त्याचबरोबर या कारवर ग्राहकांना २०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि १०,००० रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस देखील मिळेल.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -