Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Surya Grahan 10 June 2021: आज २०२१ वर्षातील पहिले सूर्यग्रहण, पाहा, अद्भूत...

Surya Grahan 10 June 2021: आज २०२१ वर्षातील पहिले सूर्यग्रहण, पाहा, अद्भूत योग

Related Story

- Advertisement -

आज भारतात २०२१ या वर्षातील पहिले सुर्यग्रहण लोकांना पाहायला मिळणार आहे. नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (नासा) च्या मते, चंद्राने उत्तर गोलार्ध ओलांडल्यानंतर हे सूर्यग्रहण पाहता येणार. नासाने या सूर्यग्रहणास एक खगोलीय घटना आहे असे वर्णन केले आहे. या सुर्यग्रहणादरम्यान चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या अगदी मधोमध येणार असल्याने तीन खगोलीय ग्रह एक दुसऱ्याच्या अगदी समोरासमोर असतील. त्यामुळे काही भागात सूर्य प्रकाशास पूर्णपणे किंवा अंशतः दिसेल. जाणून घेऊ भारतात हे सूर्यग्रहण कुठे आणि केव्हा दिसेल.

सूर्यग्रहण भारतात सर्वच ठिकाणी पाहता येणार नाही

२०२१ या वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात सर्वच ठिकाणी पाहता येणार नाही. हे सूर्यग्रहण एक वर्तुळाकार सुर्यग्रहण असणार आहे. यामुळे चंद्र पृथ्वापासून किती दूर असला तरी आकाशात तो सुर्याच्या तुलनेत खूप खूप छोटा दिसणार आहे. भारतात लड्डाख आणि अरुणाचल प्रदेशातच हे सुर्यग्रहण पाहयला मिळणार आहे. दुपारी १.४२ वाजल्यापासून सुरु होणारे हे सुर्यग्रहण सायंकाळी ६.४१ मिनिटांनी समाप्त होणार आहे. याचा पीक टाइम ४.१६ वाजल्याच्या आजपास असणार आहे. यावेळी सूर्य आणि चंद्र दोघे वृषिक राशीत प्रवेश करत २५ डिग्रीवर एकमेकांसोबत दिसणार आहेत.

सूर्यग्रहण दिसणार ‘रिंग ऑफ फायर’ सारखे 

- Advertisement -

आज १० जूनला दिसणारे सूर्यग्रहण यासाठी विशेष आहे कारण शनि जयंती दिवशीच बरोबर १४८ वर्षानंतर दिसणारे हे पहिले सूर्यग्रहण आहे. यापूर्वी २६ मे १८७३ साली शनि जयंती दिवशी सूर्यग्रहण झाले होते. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (नासा) च्या म्हणण्यानुसार, १० जूनला म्हणजेच आज दिसणारे हे सूर्यग्रहण ‘रिंग ऑफ फायर’ सारखे दिसणार आहे. यावेळी चंद्र पृथ्वीवर पोहोचणारी सुर्याची किरणे अडवून ठेवणार आहे. अशा परिस्थितीत काही काळ पृथ्वीवरील लोकांना सूर्याचे दृश्य एका प्रकाशमान चमकणाऱ्या अंगठीप्रमाणे दिसणार आहे. रिंग ऑफ फायरला वलयाकार सूर्यग्रहण म्हटले जाते. जेव्हा चंद्र त्याच्या सावलीत सूर्याचा संपूर्ण भाग व्यापण्यास असमर्थ असतो तेव्हा असे होते. अशा परिस्थितीत सूर्याचा काही भाग चंद्राच्या मागून चमकतो आणि त्याचे दृश्य आगीत जळत असलेल्या अंगठीसारखे आहे. यालाच ‘रिंग ऑफ फायर’ म्हणतात.

सूर्यग्रहणाचे हे अद्भुत दृश्य संपूर्ण भारतात दिसणार नाही. हे फक्त लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील भागांतूनच पाहिले जाऊ शकते. हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, हिंद महासागर आणि अंटार्क्टिका या भागांमधूनच दिसू शकणार आहे. याशिवाय देश-विदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी लोक थेट वेबकॅमद्वारे ते पाहू शकतात.  कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियाच्या काही निवडक भागातूनही ते पाहता येईल. या व्यतिरिक्त न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, लंडन आणि टोरोंटो येथूनही लोक हे पाहू शकणार आहत.. न्यूयॉर्कहून सूर्यग्रहणाचे ७० टक्के पेक्षा जास्त कव्हरेज दिसतील.

सूर्यग्रहण कसे, कुठे पाहावे 

- Advertisement -

नासा या सुर्यग्रहणाने लाईव्ह स्ट्रिमिंग करणार आहे. gov/live वर तुम्ही पाहू शकता किंवा ल्यूक बोलार्डच्या सौजन्य रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ कॅनडा सडबरी सेंटरवरच्य़ा You tube चॅनेलवरही पाहू शकता. परंतु हे सुर्यग्रहण पाहण्यासाठी या खरबरदारी घेतली पाहिजे याची माहिती देखील नासाने आपल्या वेबसाईटवर दिली आहे. पूर्वी लोकांनी दोन चंद्रग्रहण पाहिले होते आणि आता वर्षाचे पहिले सूर्यग्रहण आज होणार आहे. यानंतर वर्षाचे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण डिसेंबर महिन्यात दिसणार आहे.


 

- Advertisement -