कॉग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रेत’ बॉलिवूडची हजेरी, ‘या’ अभिनेत्रीने घेतला सहभाग

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात भारत जोडो यात्रा काढली जात आहे. या यात्रेचा आतापर्यंत ८२ दिवस पूर्ण झाले आहेत. कॉग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत सुरूवातीच्या दिवसापासून आतापर्यंत बऱ्याच जणांनी सहभाग घेतला.

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात भारत जोडो यात्रा काढली जात आहे. या यात्रेचा आतापर्यंत ८२ दिवस पूर्ण झाले आहेत. कॉग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत सुरूवातीच्या दिवसापासून आतापर्यंत बऱ्याच जणांनी सहभाग घेतला. अशातच या यात्रेच्या ८३व्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही सहभाग घेतला आहे. (Bollywood actor swara bhasker joins bharat jodo yatra with rahul gandhi at ujjain mp)

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात पुढे सरकलेली भारत जोडो यात्रा आता मध्य प्रदेशात आहे. मध्य प्रदेशात या यात्रेचा ८३वा दिवस असून, अभिनेत्री स्वरा भास्कर हिने मध्यप्रदेशातील उज्जैन येथे राहुल गांधी यांच्या सोबत ’भारत जोडो यात्रे’त सहभाग नोंदवला. राहुल गांधी आणि या प्रचंड जनसमुदायासोबत चालतानाचे स्वराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने काही दिवसांपूर्वी या राहुल गांधी यांच्या या प्रवासाचे कौतुक करत समर्थन केले होते. यासाठी अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार देखील या यात्रेत सहभागी झाले होते.

याआधी भारत जोडो यात्रेनं महाराष्ट्रातील १४ दिवसांचा प्रवास पूर्ण केला. या यात्रेत बॉलिवूडचे अनेक कलाकार देखील सहभागी झाले. यामध्ये पूजा भट्ट, अमोल पालेकर, रिया सेन, रश्मी देसाई आणि इतर काही कलाकार सहभागी झाले.

दरम्यान, काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली. यानंतर ही यात्रा महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधून पूर्ण होऊन सध्या मध्य प्रदेशात आहे. मध्य प्रदेशानंतर ही यात्रा राजस्थान, नंतर दिल्ली आणि उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून जात जम्मू-काश्मीरमध्ये संपणार आहे.


हेही वाचा – राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीचे राजकारण; राज ठाकरेंचा पुन्हा शरद पवारांवर आरोप