घरमहाराष्ट्र'महाराष्ट्रात ३ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक; देशात मोठी रोजगार निर्मिती'

‘महाराष्ट्रात ३ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक; देशात मोठी रोजगार निर्मिती’

Subscribe

मागील ५ वर्षात महाराष्ट्रात ३ लाख ५१ हजार ३७८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा ३० टक्के आहे. महाराष्ट्र हे देश विदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रथम पसंतीचे राज्य', असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.

‘मागील ५ वर्षात महाराष्ट्रात ३ लाख ५१ हजार ३७८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा ३० टक्के आहे. महाराष्ट्र हे देश विदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रथम पसंतीचे राज्य’, असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले आहे. देशातील उत्पन्नात राज्याचा १४.९३ टक्के वाटा आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची मागील ५ वर्षात सरासरी वाढ ९ टक्के होती. देशातील औद्योगिक उत्पादन आणि नक्त मूल्यवृद्धीमध्ये राज्याचा २० टक्के वाटा आहे. तर सेवा क्षेत्राचा स्थूल उत्पन्नातील वाटा ५५ टक्के आहे.

२ लाख ४६ हजार ९१५ कोटी गुंतवणूक

केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाच्या अहवालानुसार सन- २०१४ ते मार्च-२०१९ अखेरपर्यंत १ हजार ७९४ एवढ्या औद्योगिक उपक्रमांनी केंद्र शासनाकडे औद्योगिक उद्योजकांचे ज्ञापन सादर केलेले असून याद्वारे २ लाख ४६ हजार ९१५ कोटी गुंतवणूक झालेली असून त्यामधून ५.४० लक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मागील पाच वर्षात राज्यात एकूण १० लाख २७ हजार ०७ सूक्ष्म, लक्षू आणि मध्यम उद्योग स्थापित झालेले असून त्यामध्ये १ लाख ६५ हजार ६२ कोटी गुंतवणूक झाली असून ५९.४२ लक्ष रोजगार निर्मिती झाली आहे.

- Advertisement -

रोजगार निर्मिती

फेब्रुवारी-२०१६ मध्ये झालेल्या मेक इन इंडिया सप्ताह दरम्यान, ८ लक्ष कोटी एवढ्या गुंतवणूकीचे एकूण २ हजार ९८४ सामंजस्य करार झाले असून त्यातून अंदाजे ३० लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यापैकी मार्च- २०१९ अखेर, १ लाख १८० उद्योग स्थापन झाले असून त्याद्वारे १ लक्ष कोटी एवढी गुंतवणूक आणि ३.५ लक्ष रोजगार निर्मिती झाली आहे.

राज्यात विशाल प्रकल्प धोरण जाहीर

फेब्रुवारी- २०१८ मध्ये झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेमध्ये ३ हजार ९६४ एवढे सामंजस्य करार करण्यात आले. त्याद्वारे अंदाजे १२ लक्ष गुंतवणूक आणि ३६.९४ लक्ष रोजगार उपलब्ध होणे अपेक्षित आहे. राज्यात विशाल प्रकल्प धोरण जाहीर झाल्यापासून ६४३ विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. याद्वारे ४.७९ लक्ष कोटी गुंतवणूक आणि ५.२२ लक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यापैकी २०१ विशाल प्रकल्पांना सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत पात्रता प्रमाणपत्रे मंजुर करण्यात आली असून, याद्वारे ८७ हजार ५९६ कोटी प्रत्यक्ष गुंतवणूक आणि १.३५ लक्ष एवढी प्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाल्याची माहिती उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – मनसे विधानसभा लढणार? उद्या होणार राज गडावर बैठक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -