घरमहाराष्ट्रमिटकरींनी पंतप्रधान मोदींबद्दलच ते ट्विट वाचून दाखवलं; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली चांगलीच समज

मिटकरींनी पंतप्रधान मोदींबद्दलच ते ट्विट वाचून दाखवलं; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली चांगलीच समज

Subscribe

पंढरपूर विकासाच्या मुद्यावर आज विधान परिषदेत लक्षवेधीवर चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी एक वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद रंगला. ज्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींबाबत अशाप्रकारे बोलणं योग्य नसल्याचे म्हणत मिटकरींना चांगलीच समज दिली आहे.

मिटकरींचे वक्तव्य निंदाजनक, मुख्यमंत्री शिंदेंचा संताप 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अमोल मिटकरी तुम्ही असं बोलून जाता ते चुकीचं आहे. तुमचं जे वर्तन आहे ते चुकीचं आहे, परंतु या सभागृहाच्या भावना दुखावता कामा नये, आपण काय बोलतो याचं भान आपण ठेवलं पाहिजे, आपण आमदार आहोत. सभागृहाचे पावित्र्य जपलं पाहिजे. सभागृहातील सदस्स्यांबद्दल तुम्ही बोलताचं. पण ज्या व्यक्तिमत्त्वाबाबत तुम्ही त्यावेळी भान ठेवलं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून सांगतो की, मिटकरींचे वक्तव्य निंदाजनक असल्याची भावनाही मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केली आहे.ट

- Advertisement -

पंतप्रधानांबाबत बोलणं सहन करणार नाही

खडेस साहेब तुम्ही सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत, तुम्ही अशा वक्तव्याचे समर्थन करता कामा नये, आणि कोणी समर्थन करणार नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबाबत बोललात आम्ही काही बोलत नाही. पण पंतप्रधान यांच्याबाबत बोलणं सहन करणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिटकरी यांना चांगलीच समज दिली आहे.

अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली दिलगिरी

ज्यानंतर सभागृहाच्या सभागृहाट्या सभापती निलम गोऱ्हे यांनी अमोल मिटकरी यांनी मोदींबाबत केलेले विधान पटलावरून काढून टाकले आहे. तसेच मिटकरींनी देखील आपल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या विधानामुळे जर सभागृहाच्या भानवा दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मुख्यमंत्री शिंदे यांनी मला समज दिली आहे. माझ्या तोंडून अनावधानाने जर काही निघालं असेल तर त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो, असं मिटकरी म्हणाले.

- Advertisement -

आपली कुवत बघायला पाहिजे 

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, हे सभागृह सर्वोच्च समागृह आहे. याच पावित्र्य राखण्याचं काम सदस्यांनी करायचं असतं. पंढरपुरची लक्षवेधी होती, अमोल मिटकरी यांची पंढरपुरच्या बाबतीतील भावना मला वाटलं चांगलं होती. चांगल आहे, पंढरपुरला लाखो लोक जातात. त्यांना चांगल्या सुविधा मिळायला पाहिजेत. मीही आषाढीला गेलो होतो, तिथल्या वारकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन त्याठिकाणी विकास झाला पाहिजे. पण त्याठिकाणच्या लोकांना विश्वासात घेऊन ते करण्याचा निर्णय घेतला, कोणावरही अन्याय होऊ नये ही भावना सरकारची आहे. मला वाटलं मिटकरीचींही तिच भावना आहे. मीही त्याला सकारात्मक दृष्टीने घेत होतो, मी स्वत: त्याला उत्तर देणार होतो, परंतु असं असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत अशाप्रकारे वक्तव्य करणं हा सभागृहाचा सर्वांचा अपमान आहे. अशाप्रकारचं वक्तव्य कोणी करता कामा नये याचे भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे, आपली कुवत बघायला पाहिजे त्यांची कुबत बघायला पाहिजे. मोदी देशाचे पंतप्रधान आहे, ते आपल्या देशाचे नाव जगभरात रोशन करण्याचे काम त्यांनी केलं, आज आपल्याला अभिमान असला पाहिजे की जी २० मध्ये संपूर्ण जगाचं नेतृत्त्व करण्याची संधी भारताला मिळाली आहे,

मिटकरी नेमकं काय म्हणाले ?

पंढरपूर विकासाच्या मुद्यावर आज विधान परिषदेत लक्षवेधीवर चर्चा सुरू होती. याच मुद्द्यावर बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी उभे राहिले. यावेळी मिटकरी यांनी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रातील पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना केलेले एक ट्विट वाचून दाखवले, ज्यावरून सभागृहात सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांचा उल्लेख रावण असा करण्यात आला होता. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाला.

यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी हे स्वत: पंढरपुरला आले होते, त्यावेळी त्यांनी सुद्धा कॅरिडॉरला विरोध केला होता, मी कोणावर टीका करतो म्हणून करत नाही. पण त्यावेळी सुब्रम्हण्यम स्वामी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, रावण ज्या प्रकारे अहंकारी होता. पीएम मोदीही तसेच आहेत. कारण पंतप्रधान मोदी कोणाचेच ऐकत नाहीत. सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या वक्तव्यातून महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला होता. मिटकरींनी सुब्रम्हण्यम स्वामी यांचे हे ट्विट वाचून दाखवले. मिटकरींनी वाचून दाखवलेल्या मोदींविरोधातील ट्विटमुळे विधानपरिषदेत सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले. ज्यानंतर कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.


महिला आरक्षणाबाबत विधानसभेत मोठी घोषणा, उपमुख्यमंत्री म्हणाले कोणत्याही परिस्थितीत पुरुषांना…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -