पंकजा मुंडे भाजपला ब्लॅकमेल करतात, राणे समर्थकाचा दावा

पंकजा मुंडे भाजपला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप भाजपमधील राणे समर्थक संतोष पाटील यांनी केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात पर्याय नसल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे.

pankaja mundes emotional letter to activist announced resolution 12 december

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत डावलण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे भाजपला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप भाजपमधील राणे समर्थक संतोष पाटील यांनी केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात पर्याय नसल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. (Pankaja Munde blackmails BJP, claims Rane supporter)

पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत संधी देण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त सर्मथकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. तसेच, तुळजापुरात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मोटार अडवल्याचा प्रकार घडला. त्यानंतर भाजपमधील ही खदखद बाहेर पडली आहे.

याप्रकरणी भाजपचे राणे समर्थक संतोष पाटील म्हणाले की, “केवळ राजकीय द्वेषापोटी पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांची प्रतिमा बहुजन समाजाविरोधी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांचा पक्षांतर्गत जाणीवपूर्वक सुरू असलेला संघर्ष योग्य नाही, असं मतही व्यक्त केलं आहे.

पंकजा मुंडे नेहमीच पक्षाला ब्लॅकमेल करत असतात. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार असल्याचं सतत त्यांच्याकडून सांगण्यता येतं. मात्र, वारसदार जन्माने नाही तर कर्तृत्वाने ठरतो याचा विचार पंकजा मुंडे यांनी केला नाही, असं संतोष पाटील म्हणाले. तसेच, शरद पवार, नितीन गडकरी यांच्यानंतर दिल्लीत शब्दाचे वजन असलेला देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा नेता नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे फडणवीस यांची नेहमीच पाठराखण करतात, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.