घरताज्या घडामोडीस्वतःच्या गोष्टी पाठीशी घालून दुसऱ्यांवर ढकलणं हाच सरकारचा मूलमंत्र, पंकजा मुंडेंचा घणाघात

स्वतःच्या गोष्टी पाठीशी घालून दुसऱ्यांवर ढकलणं हाच सरकारचा मूलमंत्र, पंकजा मुंडेंचा घणाघात

Subscribe

शरद पवार यांनी यामध्ये लक्ष घातले असते तर आंदोलनाची आवश्यकता भासली नसती

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपतर्फे संपुर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या मागची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आलं असून हा ओबीसींवर घोर अन्याय झाला आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असताना राज्यात धुळे नंदुरबारसह ५ जिल्ह्यांत निवडणुका लागल्या आहेत. याच निवडणुका होऊ नये आणि ४ महिन्यांचा वेळ घेऊन इम्पेरिकल डेटाच्या आधारे ओबीसी आरक्षणाला संरक्षण द्यावे अशी मागणी आहे यामुळे भाजपचं संपुर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाला राज्य सरकारने मागणी केली पाहिजे. आतापर्यंत सहकारच्या निवडणूका, जागा भरती, मराठा आरणक्षणाच्या प्रश्नामुळे एमपीएससी आणि नोकरभरती पुढे ढकलण्यात आले कोरोनाचे कारणं देण्यात आली तेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्नामुळे आम्ही समर्थन करण्यात आले परंतु आता ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलली पाहिजे अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारमधील मंत्र्यांनी आंदोलन केलं नाही पाहिजे त्यांनी निर्णय केला पाहिजे आम्ही आंदोलन करण्यासाठी आहोत पाहिजे तेवढी आंदोलनं करु मंत्र्यांनी निर्णय करावा. तत्कालीन भाजप सरकार होते तेव्हा ओबीसी आरक्षण टिकवले होते. न्यायालयात निर्णय टिकवून धरला सरकारने ५० टक्क्यांवर आरक्षण टिकवले होते परंतु मविआ सरकारने ५० टक्क्यांवरील खालचंही आरक्षण घालवले असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे. शरद पवार यांनी यामध्ये लक्ष घातले असते तर आंदोलनाची आवश्यकता भासली नसती असे विधान पंकजा मुंडे यानी केलं आहे.

ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांवर दबाव आणण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर पंकजा मुंडेनी प्रतिक्रिया दिली आहे, की हा चौकशीचा भाग आहे. या स्वायत्त यंत्रणा आहेत. आरोप करणं आणि स्वतःच्या गोष्टी पाठीशी घालून दुसऱ्यावर आरोप करणं हाच या सरकारचा मुलमंत्री असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

प्रवीण दरेकर पोलिसांच्या ताब्यात

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली, भाजपातर्फे ठाण्यातील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूची वाहने रोखल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. ओबीसींच्या आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने टोकाचे पाऊस उचलले आहे. असे यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले. दरेकरांसह आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -