घरठाणेThane : भिवंडीत इमारतीचा भाग कोसळला, एका महिलेचा मृत्यू

Thane : भिवंडीत इमारतीचा भाग कोसळला, एका महिलेचा मृत्यू

Subscribe

मागील काही दिवसांपासून ठाण्यातील काही भागात इमारतीचे भाग आणि घराची भिंत कोसळत आहेत. या धोकादायक इमारतीचा त्रास अनेक रहिवाश्यांना सहन करावा लागत आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, मुंब्रा या परिसरानंतर आज भिवंडीतील एका इमारतीचा काहीसा भाग कोसळला आहे. त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ही घठना दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास घडली आहे. या इमारतीचं नाव अब्दुल्ला फाकी असं असून गौसिया मस्जिद, खाडीपार, भिवंडी ग्रामीण या ठिकाणी ही घटना घडली आहे. ही २ मजली इमारत असून जवळपास १५ वर्षे ही जुनी इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावरील सज्जाचा भाग इमारती जवळ उभ्या असणाऱ्या एका महिलेच्या अंगावरती पडला. सदर घटनास्थळी महिलेला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

सदर घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाचे जवान ०१, फायर वाहनासह व भिवंडी पोलीस कर्मचारी ०१ रुग्णवाहिकेसह उपस्थित होते. शहनाज झहीर अन्सारी (५५) असं मृत महिलेचं नाव आहे. तसेच महिलेचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी आय.जी.एम. हॉस्पिटल (इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, भिवंडी) येथे दाखल करण्यात आला आहे.

छताचे प्लास्टर पडून भाऊ-बहिण जखमी; मुंब्र्यातील घटना

मुंब्र्याच्या मेहक इमारतीमधील 203 या सदनिकेत छताचे प्लास्टर पडून भाऊबहिण किरकोळ जखमी झाल्याची घटना १३ जुलै रोजी गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

- Advertisement -

इब्राहिम शेख (9) आणि अनुप शेख (7) अशी दोघांची नावे असून कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. इब्राहिम याच्या डोक्याला तर, अनुप हिच्या उजव्या हाताला दुखापत झालेली आहे. ही घटना घडली तेव्हा घरात चौघे जण होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

दुर्घटनांचे सत्र सुरूच

ठाण्याच्या वागळे इस्टेट, राम नगर येथे मंगळवारी रात्री एका रिकाम्या केलेल्या चाळीतील घराची भिंत व काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास समोर झालेल्या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने बाजूच्या 3 कुटुंबांना शेजारच्या चाळीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात आले. तसेच, घरांचा आवश्यक तितका धोकादायक भाग पडण्यात आला असून घटनास्थळी चाळीतील तिन्हीही बंद रिकामी घरे धोकादायक स्थितीत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.


हेही वाचा : छताचे प्लास्टर पडून भाऊ-बहिण जखमी; मुंब्र्यातील घटना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -