घरमहाराष्ट्रमावळमधून पार्थ पवारांचा पराभव; सेनेचे बारणे विजयी

मावळमधून पार्थ पवारांचा पराभव; सेनेचे बारणे विजयी

Subscribe

मावळमध्ये अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

१७ व्या लोकसभा निवडणूकांच्या मतमोजणीला सकाळपासून सुरूवात झाली आहे. राज्यासह देशभरात धक्कादायक निकाल समोर येत आहेत. नुकताच मावळ लोकसभा मतदार संघाचाही निकाल लागला आहे. शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा मावळमध्ये पवार झाला आहे. या ठिकाणी शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना ६ लाख ७० हजार मते मिळाली आहेत. तर पार्थ पवार यांना ४ लाख ६० हजार मते पडली. त्यामुळे जवळपास २ लाख मतांच्या फरकाने श्रीरंग बारणे यांनी पार्थचा पराभव केला आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या राजाराम पाटील यांना ६६ हजार मते मिळाली आहेत.

श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार

मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा लक्षवेधी ठरली. नातू पार्थसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूकीतून माघार घेतल्याची चर्चा रंगली. संपूर्ण राज्याचे या निकालाकडे लक्ष लागले होते. श्रीरंग बारणे विरूद्घ पार्थ पवार निवडणूक अटीतटीची होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र श्रीरंग बारणे यांनी तब्बल २ लाख पेक्षा जास्त मतांनी पार्थचा पराभव केला. त्यामुळे लवकरच मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदारकीचे दुसरे पर्व सुरू करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -